इगतपुरी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथील गुरु हनुमान आखाडा येथे नाशिक जिल्हा क्रिडा विभाग मार्फत शालेय तालुकास्तरीय १४ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुले-मुलीच्या कुस्ती स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या.यावेळी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष एसएमबीटी रुग्णालय येथील व्यवस्थापकीय अधिकारी एस.बी. खरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तनुजाताई घोलप, गुरु हनुमान आखाडा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे , दत्तूपाटील जुंदरे, शिवाजीराजे फोकणे,भगवान जुंदरे, माजी कुस्ती खेळाडु, वस्ताद व परीसरातील ग्रामस्थ
तालुका क्रिडा प्रमुख विजय सोनवणे, शिंदे सर तसेच तालुक्यातील शाळा व काॕलेज मधील क्रिडा शिक्षक तसेच कुस्ती खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय जिवनात खेळाची आवड असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी खेळात सहभागी व्हावे. कुस्ती स्पर्धेसाठी येत्या काही दिवसात कुस्ती खेळासाठी एसएमबीटी रुग्णालयाच्या वतीने स्वयम अर्थसहाय्य करुन सहकार्य करणार असून कुस्तीच्या सरावासाठी नवीन आखाडा कुस्ती स्टेडीअम सुरु करणार असल्याची माहीती एसएमबीटी व्यवस्थापक एस.बी. खरे यांनी आश्वासन दिले.
सर्व विद्यार्थी खेळाडूंना तनुजा घोलप, ज्ञानेश्वर शिंदे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी खेळाडूना मार्गदर्शन करण्यात आले.