महाराष्ट्र
सहकाराबाबतचे केंद्र सरकारचे काही निर्णय चुकीचे : शरद पवार
By Admin
श्रीगोंदा- सहकाराबाबतचे केंद्र सरकारचे काही निर्णय चुकीचे : शरद पवार
नेता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खा. शरद पवार- आ.बबनराव पाचपुते
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
केंद्राचे काही निर्णय बरोबर आहेत तर काही निर्णय चुकीचे आहेत. राष्ट्रीयकृत बँका गोरगरिब शेतकऱ्यांना दारात उभ्या करीत नाहीत. पण ग्रामीण भागातील शेतकरी गोरगरीब कष्टकरी छोटे मोठे व्यवसायिक सहकारी संस्थांनी आर्थिक पाठबळ दिल्यानेच उभे राहिले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काष्टी येथे बोलताना केले.
श्रीगोंदा : देशासह राज्यात सहकार चळवळी ही अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याने सुरू केली. यामध्ये प्रामुख्याने साखर कारखाना, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, दूध संघ, पतसंस्था अशा संस्था उभ्या राहिलेल्याने सहकार चळवळीला बळकटी आली. परंतु केंद्राचे काही निर्णय बरोबर आहेत तर काही निर्णय चुकीचे आहेत. राष्ट्रीयकृत बँका गोरगरिब शेतकऱ्यांना दारात उभ्या करीत नाहीत. पण ग्रामीण भागातील शेतकरी गोरगरीब कष्टकरी छोटे मोठे व्यवसायिक सहकारी संस्थांनी आर्थिक पाठबळ दिल्यानेच उभे राहिले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काष्टी येथे बोलताना केले.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील महेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या नवीन प्रशासक इमारतीच्या लोकार्पण सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार होते.
यावेळी पवार पुढे म्हणाले की, मुंबईतही सहकारी सूतगिरणी होती. त्या काळापासून सहकाराला यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांनी बळकटी दिली. व राज्यभर सहकारी बँक, सहकारी सोसायटी, दूध संघ, पतसंस्था सहकाराचे जाळे विणले. यामुळेच सहकारामध्ये देशात महाराष्ट्र एक नंबरवर आहे. गुजरात दोन नंबरवर तर नंतर केरळ तामिळनाडू हे सहकाराच्या माध्यमातून विकास साधत आहेत. तर खाजगी दूध संस्था साखर कारखाने यांची सुरुवातही नगर जिल्ह्यातून झाली आहे. परंतु सहकारी चळवळीला बळकटी द्या, सहकारी बँका, सहकारी सोसायटी, पतसंस्था या गोरगरीब कष्टकरी छोटेमोठे व्यवसायीक यांना आर्थिक पाठबळ देऊन उभे करण्याचे काम करत आहे. यामुळे सहकार चळवळ टिकवा. असं पवार बोलत होते.
देशात शेतीला मर्यादा आहेत. देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती ८० टक्के लोक शेती करत होते. आज देशाची लोकसंख्या ११६ कोटी असून ६५ टक्के लोक शेती करतात. लोकसंख्या वाढली परंतु औद्योगिक उद्योग रस्ते धरणे घरे वाढली. यामुळे शेतजमीन कमी झाली. शेतीशिवाय पर्याय व्यवसाय उद्योगधंदे नोकर्या असे उपक्रम राबवुन तरुण पिढी उभी राहिली पाहिजे. असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.
कार्यक्रमास माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आ. बबनराव पाचपुते, आ. आशोक पवार निलेश लंके, आशुतोष काळे, संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस बाळासाहेब नाहटा, राजेंद्र फाळके दादाभाऊ कळमकर, दीपक भोसले, अमित लगड, आण्णासाहेब शेलार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
राज्यात सरकार येतात जातात परंतु नेता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खा. शरद पवार हे आहेत. असे भाजपचे नेते आमदार बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथील सभेत आपल्या भाषणात सांगितले. यामुळे मंडपात एकच चर्चेला उधाण आले.
Tags :
8509
10