राष्ट्रीय महामार्ग संबंधी गुन्हे दाखल करणार - पाथर्डी मा. प्रांत केकान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहर आणि तालुक्यातील अनेक गावांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 61 च्या दुरावस्थेमुळे तालुक्यातील आणि परिसरातील जवळपास 400 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला तसेच 1000 पेक्षा जास्त लोकांना अपंगत्व आले आहे.याला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पाथर्डी आणि शेवगावच्या वतीने मा प्रांत केकान साहेब यांना निवेदन दिले. शेवगावचे मा सभापती क्षितिज घुले पाटील,राष्ट्रवादी अध्यक्ष शिवशंकर राजळे,संजय कोळगे, बंडू पाटील बोरुडे व सर्व पदाधिकारी यांनी यासंबंधी तातडीने कार्यवाही करावी असा आग्रह धरला.
गेल्या 15 दिवसांपूर्वी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी असे महामार्ग कार्यालयाला सूचना देऊनही त्यांनी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती,परिणामी पावसात पुन्हा चिखल होऊन खड्डे वाढले.
येत्या 14 तारखेला मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बैठकीत रस्ता दुरुस्ती संबंधी निर्णय घेणार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी फोनवर सांगितले,परंतु त्यानंतरही निर्णय न झाल्यास संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला जाईल असे मा. प्रांत केकान यांनी सांगितले.