महाराष्ट्र
श्री आनंद जन्मोत्सवानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी अशा विविध उपक्रमाचे आयोजन
By Admin
श्री आनंद जन्मोत्सवानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी अशा विविध उपक्रमाचे आयोजन
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी (शिराळ) येथील श्री आनंद जैन मेडिकल ट्रस्ट येथे श्री आनंद ऋषीजी ब्लड बँक, श्री आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर, श्री तिलोक ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी, साई माऊली हॉस्पिटल अहमदनगर, श्री आनंद गुरु गोशाळा मिरी, श्रीवर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघ चिचोंडी (शिराळ) या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रसंत आचार्य सम्राट प.पू.श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत शुगर व बीपी तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमाचे आयोजन नुकतेच श्री आनंद चिकित्सालय चिचोंडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरांना चिचोंडी पंचक्रोशीतील आनंद भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरा दरम्यान ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून पुण्य कर्म केले तर १७२ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी होऊन ३० रुग्णांवर अल्प दरात श्री आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचप्रमाणे १२१ रुग्णांची मोफत शुगर तपासणी व बीपी तपासणी साई माऊली हॉस्पिटल अहमदनगर येथील डॉ. संतोष गीते यांचे सौजन्याने करण्यात आली.
या सर्व रुग्णांना व आनंद भक्तांना परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांची कृपादृष्टी व शासन गौरव मधुर व्याख्यानी प.पू. सुनंदाजी महाराज आदीठाणा ६ व ह. भ. प. श्री प्रवीण महाराज गोसावी पैठण यांचे शुभाशीर्वाद लाभले.
या शिबिराचे उद्घाटन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी यांचे हस्ते झाले. याप्रसंगी माजी सरपंच एकनाथराव आटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव आव्हाड, कार्यकर्ते बहादूर शेख, डॉ. महानोर, डॉ. आनंदकुमार छाजेड, विश्वजीत गुगळे, डॉ.अभयकुमार भंडारी, आनंदकुमार चोरडिया, कमलेश गुगळे, राजू मेहेर, मनसुखलाल पिपाडा, सतीशलाल गुगळे, सुरेशलाल कुचेरिया, राजेंद्र मुथ्था, अमोल चंगेडिया (अळकुटी) आदींची उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी बोलतांना श्री आनंद जैन मेडिकल ट्रस्टचे सेक्रेटरी विश्वजीत गुगळे यांनी या संस्थेमार्फत वेळोवेळी संपन्न होणाऱ्या विविध शिबिरात सहभागी होण्याचे व शिबिराचा व श्री आनंदचिकिसालयातील उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी विश्वजीत गुगळे (सेक्रेटरी), अभयकुमार भंडारी (खजिनदार), डॉ. सचिनकुमार गांधी (विश्वस्त), प्राचार्य सुभाष खेडकर, डॉ. बाबासाहेब गरड (वैद्यकीय अधिकारी), गोवर्धन देखणे, मन्नान शेख, डॉ. महानोर व स्टाफ, डॉ. भिसे, डॉ. बोठे व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोवर्धन देखणे यांनी केले तर आभार डॉ. बाबासाहेब गरड यांनी मानले.
Tags :
60040
10