राजळे महाविद्यालयात प्रा.राजू घोलप यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल सत्कार
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील
दादापाटील राजळे महाविद्यालयाचे नॅक समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख प्रा. राजू त्रिंबक घोलप यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.त्यानिमित्त महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. पेशवेकालीन अहमदनगर सुभ्याचा आर्थिक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. भूषण फडतरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्रस्तुत संशोधन मोडी कागदपत्रे, ब्रिटिश कागदपत्रे-अहवाल अशा मूळ ऐतिहासिक साधनांवर आधारित असून त्यामुळे अहमदनगरच्या ऐतिहासिक संशोधनात मोलाची भर पडेल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी डॉ. राजू घोलप यांचा सत्कार प्रसंगी व्यक्त केले. या सत्कार प्रसंगी त्यांनी या संशोधनाचे रूपांतर पुस्तकात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून हे संशोधन सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवावे असे मत व्यक्त केले. डॉ. राजू घोलप यांनी त्यांच्या मनोगतामध्ये दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. आप्पासाहेब राजळे, मा. आमदार मोनिकाताई राजीव राजळे, संस्थेचे विश्वस्त मा. राहुल राजळे , महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव राजळे, सचिव मा.जे.आर.पवार,प्राचार्य डॉ. राजधर टेमकर व सर्व प्राध्यापकांचे संशोधनाच्या काळामध्ये मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री. विक्रमराव राजळे, डॉ. मेहबूब तांबोळी, डॉ. जनार्दन नेहुल, डॉ. सुभाष देशमुख, प्रा. अशोक काळे, प्रा. एस. एस. गरड यांनी सर्व प्राध्यापकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल चौरपगार तर आभार प्रा. आसाराम देसाई यांनी केले.