योगिता खेडकरला राष्ट्रीय ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक
पाथर्डी प्रतिनिधी
भुवनेश्वर, ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. योगिता खेडकर हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतांना ८७ किलो वजनी गटात ३ ज्युनिअर राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
योगिता खेडकर हिस महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रा. विजय देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले.