पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना चाचण्या वाढवा.- दादासाहेब फुंदे
पाथर्डी - प्रतिनिधी
देशात दुसऱ्या लाटेत शहरा सोबत ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात घरोघरी जाऊन वेगाने कोरोनाच्या चाचण्या केल्या जाव्यात, अशी मागणी भुतेटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब फुंदे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली आहे.
गावामध्ये कोरोना बाबत अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती मोहीम सुरु करावी. या मुळे कोरोना संसर्गाचे स्वरुप, प्रतिबंधात्मक उपाय या बद्दल माहिती ग्रामस्थांना मिळण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना चाचणी, लसीकरण केंद्रे, डॉक्टर, बेड याबद्दल माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचा वापर करावा. त्याच बरोबर लसिकरण करतांना ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी दादासाहेब फुंदे यांनी केली.