पाथर्डीत बाहेरील तालुक्यातील नागरिकांनी लस घेण्यास येऊ नये.- अमोल (भैया) गर्जै
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील लसीकरण केंद्रावर गेली तीन दिवस झाले पाथर्डी मध्ये 18 ते44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू झाले आहे. 3 दिवसात 600 लसीकरण झाले त्यामध्ये 600 पैकी जवळपास 500 तालुक्या बाहेरील नागरिकांनी अतिक्रमण करून इथे लस घेतली त्यास आज पाथर्डी शहरातील लसीकरण केंद्रावर भाजपचे युवा नेते अमोल ( भैय्या) गर्जै तसेच त्यांचे सहकारी प्रतिनिधी यांनी प्रखर विरोध करून पाथर्डी शहर व तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाच लस उपलब्ध व्हावी यासाठी लसीकरण बंद पाडुन विरोध दर्शविला असून उद्यापासून पाथर्डी शहर व तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अपॉईंटमेंट घेऊन लस उपलब्ध होणार आहे तरी बाहेरील तालुका जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी लस घेण्यासाठी येऊ नये कारण तालुक्यातच रुग्णसंख्या वाढत असल्याने तालुक्यातील लोकांना लसीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे.तालुका तसेच जिल्हा बाहेरुन येणाऱ्या लोकांना पाथर्डी येथे लस आम्ही घेऊ देणार नाही.तसेच आॕनलाईन नोंदणी करताना कोविन अॕपवर लस घेण्यासाठी पाथर्डी केंद्राची निवड करु नये.तसेच जर कोणी नोंदणी केली तर उद्यापासून बाहेरील तालुक्यातून येणाऱ्या लोकांना आम्ही लसीकरण केंद्रावर लस घेवू देणार नाही. अशी भुमिका भाजपा युवा मोर्चाचे अ.नगर जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जै व सहकारी यांनी घेतली आहे. तसेच बाहेरील तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांनी लस आपल्याच गावी तसेच तालुक्यात घ्यावी. अशी नम्रपणे विनंती अमोल गर्जै यांनी लस घेण्यासाठी बाहेरील तालुक्यातील येणाऱ्या लोकांना केली आहे.