पाथर्डी लसीकरण केंद्रावर तहसिलदार श्याम वाडकर यांनी स्वतः उपस्थित राहून नागरीकाच्या गर्दीवर केले नियंत्रण
नगर सिटीझन live टीम प्रतिनिधी - शुक्रवार 07 मे 2021
पाथर्डी येथे स्वतः लसीकरण केंद्रावर तहसिलदार श्याम वाडकर यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व गर्दीचे नियंत्रण केले. तसेच त्यांच्यासोबत नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांनी सर्वांना मार्गदर्शक सूचना करत लसीकरण कशा पद्धतीने होत आहे याची माहिती दिली. गर्दीवर नियंत्रण मिळवले या कामी नगर पालिका कर्मचारी व तालुका पोलीस कर्मचारी यांनी साथ दिली. आत्ता लसीकरण केंद्रावर अगदी तुरळक गर्दी असून लसीकरण खूप व्यवस्थित पणे चालू आहे.