महाराष्ट्र
2257
10
प्रत्येक व्यक्तीची जन्मभूमी ही आई समान असते
By Admin
प्रत्येक व्यक्तीची जन्मभूमी ही आई समान असते-ह.भ.प.मुकुंदकाका जाटदेवळेकर
जाटदेवळे गावातील स्थलांतरित गावकऱ्यांचा स्नेहमेळावा
पाथर्डी प्रतिनिधी:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जन्मभूमीचे अनन्य साधारण महत्त्व असते. आपण आयुष्यात कितीही प्रगती केली, उच्च पदावर गेलो तरीही गावच्या मातीशी आपली नाळ जुळलेली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपणास सतत गावाकडची ओढ लागली पाहिजे,असे प्रतिपादन ह. भ.प.गुरुवर्य प्रज्ञाचक्षु मुकुंद महाराज जाटदेवळेकर यांनी व्यक्त केले. अनुस्पर्श फाउंडेशन आयोजित आम्ही जाटदेवळेकर या गावातील स्थलांतरित गावकऱ्यांच्या स्नेहमेळावा याकार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.
"गावची माती"आणि "गावची माणसं" याला अतिशय महत्त्व देत अनुस्पर्श फाउंडेशन मार्फत "आम्ही जाटदेवळेकर" गावकऱ्यांचा स्नेह मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये पूर्वी गावामधून अनेक नागरिक, कुटुंब नोकरी, व्यवसाय किंवा इतर अशा विविध कारणासाठी बाहेरगावी स्थायिक झाली. गावचा नागरिक आज सर्वत्र महाराष्ट्र भर पसरलेला आहे आणि अतिशय दुर्गम अशा भागातील माणसेही अतिशय कर्तुत्ववान, हुशार, चिकाटी या सर्व गुणांनी संपन्न असल्याने भरपूर मंडळी ही अतिशय उच्च पदावर कार्यरत आहेत.सर्व विस्थापित झालेल्या नव्या जुन्या पिढ्यांना एकत्र घेऊन गावातील सर्व लोकांची एकमेकांची ओळख व्हावी, आपल्या गावच्या माणसाने आपल्या जाटदेवळे गावाशी असलेली मायेची नाळ अधिक दृढ करावी, असा उद्देश ठेवून गावातील सर्व समाजातील अनेक कुटुंबे एकत्रित येऊन गावातील नव्या- जुन्या आठवणींचा उजाळा करावा, एकमेकांची ओळख व्हावी, हा या मागील हेतू होता. या कार्यक्रमांमध्ये गावचा आराखडा राजेंद्र पवार यांनी सादर केला. गावची गेली ५०-६० वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याचा उल्लेख करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ह.भ. प. गोविंद महाराज जाटदेवळेकर, ह.भ. प. सुदर्शनमुनी महाराज उदासिन, ह.भ. प. रामकृष्ण महाराज शास्त्री इत्यादी अतिथी उपस्थित होती. त्याचबरोबर गावातील विविध समाज घटकांतील अतिशय उच्च पदावरील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात नावलौकिक असणारी मंडळी उपस्थित होती. यामध्ये प्राचार्य डॉ. शेषराव पवार, रसिकलाल पटवा, बाबुराव राऊत, प्रभाकर जाधव, डॉ. महेंद्रकुमार पटवा, कांतीलाल पटवा, दिलीप पटवा, संतोष पटवा, डॉ. संतोष राठोड, दादासाहेब फाळके, शरद घायाळ, नारायण जाधव, दिलीप घायाळ, वसंत वाहलकर, लक्ष्मण पवार, आजिनाथ कांबळे, अभिमन्यू भोसले,सुशीलकुमार पटवा, हनुमंत पवार, प्रितेश पटवा अशी आदी व्यक्ति व त्यांची कुटुंबातील सदस्य ही उपस्थित होती.
या गावच्या "आम्ही जाटदेवळेकर" कार्यक्रमांमध्ये ह.भ. प. गुरुवर्य प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाटदेवळेकर यांना अनुस्पर्श फाउंडेशन मार्फत "जाटदेवळे भूषण" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प. पूज्य काकांनीही अनेक अशा नव्या-जुन्या पिढीची असलेली गोडी, जिव्हाळा, प्रेम यावर आपली भावना, मनोमन व्यक्त करत जून्या नव्या पिढीतील व्यक्तीशी चर्चाही केली. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व गावकऱ्यांना गावाकडची चटकदार झणझणीत पोहे व गावचे प्रसिद्ध प्युअर म्हशीच्या खव्याचे पेढे देऊन अल्पोहार देण्यात आला.
अशा या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनुस्पर्श फाउंडेशनचे सचिव डॉ. उद्धव घोशिर यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी अतीशय बहारदार पद्धतीने केले व आभार बापू पवार यांनी मानले. या सर्व कार्यक्रमासाठी समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले व कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला.
Tags :

