इगतपुरी तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धातून विद्यार्थ्यांची जिल्हा
By Admin
इगतपुरी तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धातून जिल्हा स्तरावर निवड
इगतपुरी- नाशिक जिल्हा क्रिडा विभाग कार्यालय यांच्या वतीने इगतपुरी तालुकास्तरीय(दि.०३) महात्मा गांधी हायस्कूल येथे झालेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत संपन्न झाल्या.यावेळी अनुक्रमे १४,१७,१९ वर्षे वयोगटातील मुलेव मुली सहभागी झाले होते.सुमारे शेकडो खेळाडूंनी वेगवेगळ्या वयोगटात सहभाग घेतला होता त्यात आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना घवघवीत यश मिळाले असून जिल्हा स्तरावर त्यांची निवड झाली आहे.
याप्रसंगी स्पर्धा सुरू होण्या अगोदर या स्पर्धे प्रसंगी इगतपुरी नगरपालिका नगर सेवक भूषण जाधव,वंडरलँड इंग्लिश स्कुल टिटोळी शाळेचे उप मुख्याध्यापक सुनील आहेर ,तसेच इगतपुरी तालुका क्रीडा प्रमुख दगडू तेलोरे,क्रिडा शिक्षक व संयोजक विजय सोनवणे,पञकार अमोलराजे म्हस्के,महाजन सर तसेच तालुक्यातील इतर शाळांतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते .
आपल्या शाळेचे माजी क्रीडा शिक्षक व सध्याचे उपमुख्याध्यापक प्रसाद चौधरी यांनी खेळाडूंना अतिशय उत्कृष्ट बुद्धीबळ या खेळाबद्दल खेळाडूंनी कसे खेळावे व खेळाडू कसा राहिला पाहिजे याबद्दल माहिती दिली.
तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मनोहर शिंदे व पर्यवेक्षिका श्रीमती गायकवाड मॕडम उपस्थित राहुन विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच शाळेच्या यशा बद्दल खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ क्रीडा शिक्षक विजय सोनवणे, राहुल पंडित तसेच रमेश उबाळे यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खालील प्रमाणे निकाल -१४ वर्षा आतील मुले प्रथम क्रमांक कु. रिवंश बाळकृष्ण भटाटे ८ वी द्वितीय क्रमांक कु. प्रेम मंगेश कडू ८ वी
तृतीय क्रमांक अथर्व योगेश कडू 8 वी
14 वर्ष मुली प्रथम क्रमांक सोनाक्षी संतोष खारके ८वी व्दितीय क्रमांक निधी नरेश वानखेडे ६वी,१७ वर्षा आतील मुले प्रथम क्रमांक आयुष सागर चोथ१० वी,व्दितीय क्रमांक सिद्धार्थ दत्तात्रय भोर९ वी,तृतीय क्रमांक अनिश न्यानेश्वर म्हसणे १० वी,१७ वर्ष मुली प्रथम क्रमांक प्रणिता प्रवीण चौधरी ९वी,द्वितीय क्रमांक श्रेया रमेश आडोळे ९वी,तृतीय क्रमांक हिमाक्षी तूवर १० वी
१९ वर्ष मुले प्रथम क्रमांक ओम प्रमोद मोहबे १० वी,द्वितीय क्रमांक वेदांत राकेश राठोड १०वी,तृतीय क्रमांक हर्षवर्धन डावखर १० वी या सर्वांचे जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.
11779
10




