महाराष्ट्र
18154
10
पदवीधर डी.एड, कला, क्रीडा शिक्षक शिक्षकेतरांचे बेमुदत उपोषण
By Admin
पदवीधर डी.एड, कला, क्रीडा शिक्षक शिक्षकेतरांचे बेमुदत उपोषण
शिक्षणाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित
अहमदनगर प्रतिनिधी:
महाराष्ट्र पदवीधर डीएड, कला, क्रीडा शिक्षक शिक्षकेतर संघ शाखा अहिल्यानगर यांचे वतीने सहा अन्यायग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत दि.१६ एप्रिल २०२५ पासून विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
परंतु पहिल्याच दिवशी श्री विधाते विजय, श्री देशमुख सचिन, श्री साळवे नरेश, श्री घोडके कैलास, श्री वाघमारे कैलास, श्रीमती कुरापटी मीना यांच्या विविध मागण्याचे पत्र शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त होताच १६ एप्रिल रोजी लेखी आदेश काढून तीन मागण्याच्या बाबतीत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे तर तीन मागण्या संदर्भात उच्च स्तरावर सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिल्याने १७ एप्रिल सायंकाळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस यांचे आदेशाने उपशिक्षणाधिकारी श्रीमती भोर, अधीक्षक वर्ग १- महावीर धोदाड, वरिष्ठ लिपिक शरद वाकडे व इतर कार्यालयीन कर्मचारी यांचे उपस्थितीत कक्ष अधीक्षक महावीर धोदाड यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस दिले व संघटनेकडून उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या उपोषणकर्त्यांना जिल्हा राज्यस्तरीय संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच फोनद्वारे जाहीर पाठिंबा दर्शविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्याचे श्री वाघमारे, श्री नवगिरे, श्री डोळस, शिक्षक भारतीचे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, विभागीय सचिव महाविद्यालयीन शिक्षक संघाचे किशोर धुमाळ, भाजप किसान मोर्चाचे श्री विनोद बंगाल, संजय जाधव, लहुजी टाइम्स चे संपादक विनायक जवणे, अहमदनगर उत्तर लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे, दक्षिण लोकसभा खासदार निलेश लंके, त्यांचे स्वीय सहाय्यक श्री हांडे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड.अरुण जाधव, डॉ. योगेश साठे, शिक्षक संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद काळपुंड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष रंगनाथ मोरे, सचिव विजय विधाते, सहसचिव अरुण शेलार प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र चव्हाण, नेवासा अध्यक्ष मुसा सय्यद, महिला आघाडीच्या मीना सदाफुले, मनीषा जगदाळे, अंजली विधाते,सौ.काटे, दिलीप धुमाळ, प्रकाश आरोटे, शिवाजी गोर्डे, वीरेश नवले आदी मान्यवरांनी दूरध्वनीवरून पाठिंबा दिला तसेच राज्याचे राज्य अध्यक्ष दिलीप आवारे, महासचिव महादेव माने, संघटन मंत्री नवनाथ टाव्हरे, कार्याध्यक्ष बाजीराव सुपे हे मान्यवर सतत दूरध्वनीच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांच्या परिस्थितीची विचारपूस करून मार्गदर्शन करत होते.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, ॲड. अरुण जाधव, योगेश साठे, महेश पाडेकर, विश्वास वाघमारे, किशोर धुमाळ यांच्या सहमतीने उपोषण आंदोलन शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले.
Tags :

