महाराष्ट्र
118471
10
ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय कासार पिंपळगाव समोरील
By Admin
ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय कासार पिंपळगाव समोरील
दि.6 सप्टेंबरच्या उपोषण (अन्नत्याग आंदोलनाबाबत)
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, आरोग्य उपकेंद्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या चार विभागांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे व अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत व शिक्षण विभागा मार्फत शिकाऊ प्रशिक्षणार्थी यांची भरती आपल्या गावातील वरील चार कार्यालयांमध्ये झाल्याचे समजते. सदर चारही विभागांमध्ये झालेली भरती ही अत्यंत गोपनीय पद्धतीने झालेली असून वास्तविक पाहता सदर भरतीची माहिती ही स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन, गावामध्ये सूचना फलकावर लिहून, ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वनीक्षेप कावरून दवंडी देऊन व सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील व्हाट्सअप ग्रुपद्वारे आपल्या नागरिकांना व बेरोजगार युवकांना देणे गरजेचे होते. सदर भरती प्रक्रियेची गावातील नागरिकांना माहिती देण्याचे वर सांगितल्याप्रमाणे एवढे सर्व प्रकार खुले असताना देखील आपण ही भरती प्रक्रिया गावातील बेरोजगार तरुण-तरुणींना अंधारात ठेवून अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेली आहे.
सदर चारही विभागांमध्ये झालेली भरती प्रक्रिया ही गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून रीतसर अर्ज मागवून त्यांची परीक्षा घेऊन तसेच शैक्षणिक गुणवत्तेनुसार कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही निवड होणे गरजेचे होते.
सदर भरती प्रक्रिया चारही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी गावामधील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना कुठलीही पूर्व सूचना न देता अंधारात ठेवून शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या खास मर्जीतील उमेदवाराकडून अर्ज घेऊन भरती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेमुळे गावांमधील बेरोजगार व गोरगरीब तसेच ज्या तरुण-तरुणींना नोकरीची खास गरज होती अशा गरजवंतावर अन्याय झालेला आहे याचे निषेधार्थ आम्ही खाली सही करणार शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 8.30 वा. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय कासार पिंपळगाव या ठिकाणी उपोषणास बसून अन्नत्याग आंदोलन करणार आहोत जोपर्यंत गावांमधील बेरोजगार तरुणावर झालेला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही सदर ठिकाणी बसून राहणार आहोत यावेळी होणाऱ्या घटनेची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील.अशी निवेदन प्रत
मा. ग्रामसेवक / तलाठी / आरोग्य अधिकारी / मुख्याध्यापक, कासार पिंपळगाव यांना पाठवण्यात आली आहे.असून
श्री संदीप म्हातारदेव राजळे,श्री मुरलीधर एकनाथ भगत .6 सप्टेंबरच्या उपोषण अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
Tags :
118471
10





