महाराष्ट्र
बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक गटात
By Admin
बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक गटात
अन्नसुरक्षा प्राधिकरणाचा निर्णय; थर्ड पार्टीकडून वर्षातून एकदा तपासणी आवश्यक
नगर सिटीझन live टिम - वृत्तसंस्था
बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक असल्याने बाटलीबंद पाण्यास हाय रिस्क फूड वर्गवारीमध्ये टाकण्याचा निर्णय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) घेतला आहे.
बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर सेगमेंट आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे विविध नमुन्यांतून आढळून आले आहे.
त्यामुळे बाटलीबंद पाण्याची तपासणी त्रयस्थ पार्टीकडून करण्याची शिफारस एफएसएसएआयने केली आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यात बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सच्या (बीआयएस) प्रमाण- पत्राची अट रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा विभागाने बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे.
पॅकेज्ड वॉटरसाठी
बीआयएसच्या प्रमाणपत्राची अट काढून टाकण्यात आल्यामुळे बाटलीबंद पाण्याचा धोकादायक श्रेणीत समावेश करण्यात आल्याची माहिती अन्नसुरक्षा विभागातील सूत्रांनी दिली. बाटलीबंद पाण्याचा समावेश फूड प्रॉडक्टस्मध्ये होतो. त्यामुळे पॅकेज्ड वॉटरचा अतिधोकादायक श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
मिनरल वॉटर मॅन्युफॅक्चरर्स आणि प्रोसेसर्सना यापुढे काटेकोरपणे प्रोटोकॉलची अंमलबजावणी करावी
केंद्राने बीआयएसच्या प्रमाणपत्राची अट काढल्यानंतर नियमात दुरुस्ती
नियमित तपासणी केल्यावरच कंपन्यांना प्रमाणपत्र मिळणार
उद्योगांची जनतेप्रती जबाबदारी निश्चित होणार
बाटलीबंद पाण्याशी संबंधित उद्योगांचे लोकांप्रती उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी 'एफएसए- सएआय'ने कठोर पावले उचलली आहेत. यामुळे लोकांना दर्जेदार बाटलीबंद पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उत्पादकांना पॅकेज्ड वॉटरचे वर्षातून एकदा मान्यताप्राप्त संस्थेकडून ऑडिट केल्यावरच परवाना द्यावा, असेही एफएसए- सएआयने म्हटले आहे.
बाटलीबंद पाणी अतिधोकादायक प्रवर्गात
मान्यता दिलेल्या थर्ड पार्टीकडून मिनरल वॉटर कंपन्यांनी वर्षातून एकदा तपासणी करून घ्यावी. अशी तपासणी केल्यावरच बाटलीबंद पाण्यासाठी परवानगी दिली जाईल, असेही अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हटले आहे.
मिनरल वॉटर मॅन्युफॅक्चरर्स आणि प्रोसेसर्सना यापुढे काटेकोरपणे प्रोटोकॉलची अंमलबजावणी करावी लागणार आहे. परवाना अथवा नोंदणी करण्याआधी तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.
मान्यताप्राप्त संस्थेकडून ऑडिट होणार
अन्नसुरक्षा मानके प्राधिकरणाच्या वतीने बाटलीबंद पाण्याची नियमित तपासणी करण्यासाठी नियमात सुधारणा करण्यात आली आहे. बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उत्पादकांना पॅकेज्ड वॉटरचे वर्षातून एकदा मान्यताप्राप्त संस्थेकडून ऑडिट केल्यावरच परवाना द्यावा, असेही एफएसएसएआयने म्हटले आहे.
Tags :
49835
10