महाराष्ट्र
51885
10
विवेक ढाकणे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा-
By Admin
विवेक ढाकणे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा- डॉ. ज्ञानेश्वर दराडे
ढाकणेंची नगररचना सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील अकोला येथील संजय ढाकणे यांचे चिरंजीव विवेक ढाकणे यांची नुकतीच नगररचना सहाय्यक वर्ग -२ पिंपरी चिंचवड येथे नगररचना विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत निवड करण्यात आली.
त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, कै.लोकनेते बबनरावजी ढाकणे साहेबांच्या स्मृतींना उजाळा देत, राजकीय क्षेत्रात अन् आता प्रशासकीय क्षेत्रातही ढाकणेंच्या पुढच्या पिढीचा प्रवास विशेष भुषणावह आहे. विवेक ढाकणे यांची नगर रचना सहाय्यक वर्ग दोन महाराष्ट्र शासन अंतर्गत निवड झाली आहे. विवेक ढाकणे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा.
आमचं आजोळ अकोला,मामांचं गाव..अनेक बालपणीचे सवंगडी भेटून आनंद झाला, सुरूवातीच्या काळात मी येथे काही काळ वैद्यकीय सेवा केली असल्याने अनेकांशी माझा ऋणानुबंध आहे, त्यालाही उजाळा मिळाला. संजुभाऊ यांच्या दोन्ही मुलांच्या यशानं भगवंताच्या कृपेचा प्रसाद ..विवेक अन् वैभव.. रुपाने मिळतोच हे पून:प्रत्ययास आल्याचे आवर्जून नमूद केले, असे शेवटी ते म्हणाले.
ग्रामीण युवक संघटना, ग्रामपंचायत अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला वैभव ढाकणे सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग, सरपंच बाबू पा.गर्जे ,मेहबूब शेख, ज्ञानेश्वर गिरी,सुनिल ढाकणे,सुरेश ढाकणे,बबनराव गर्जे,जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापक राजेंद्र गर्जे, अनिरुद्ध मुंडे, पत्रकार चंद्रकांत वाखुरे, दादा पंडित, अनेक युवा सहकारी, नातेवाईक परिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन पनवेल येथे कार्यरत असलेले शिक्षक प्रा.राजेंद्र गर्जे यांनी केले तर आभार यशस्वी विद्यार्थ्याचे वडील संजय ढाकणे यांनी मानले.
Tags :
51885
10





