महाराष्ट्र
तिसगाव येथील खून प्रकरणातील दहा आरोपींना मोक्का
By Admin
तिसगाव येथील खून प्रकरणातील दहा आरोपींना मोक्का
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मच्छिद्र ससाणे यांच्या खून प्रकरणातील दहा आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. संघटित गुन्हेगारी करून समाजात दहशत पसरविणाऱ्या आरोपींना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. यातील पाच आरोपींना अटक करून अहिल्यानगर येथील विशेष मोक्का न्यायाधीश बागल यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक सुनील पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मोक्का लावण्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कोठेवाडी अत्याचार व दरोडा प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आला होता. त्यांना न्यायालयाने शिक्षाही दिलेली आहे. तिसगाव येथे मच्छिद्र तुकाराम ससाणे (वय ७२), रा. भडकेवस्ती, शिरापूर रोड यांचा ६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ००.४५ वाजता खून करण्यात आला होता. या वेळी चोरट्यांनी चार कोंबड्या चोरल्या होत्या. मच्छिद्र ससाणे यांनी त्यांच्या पत्नीला चोरटे दमदाटी करीत होते, त्यामुळे ससाणे यांनी चोरटयांना प्रतिकार केला, याचा राग येऊन एका चोरट्याने काही तरी धारदार शखाने ससाणे यांच्या डोक्यात मारले. ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी
केला. तपासात नितीन दराडे यांनीही सहकार्य केले. यातील आरोपी उमेश रोशन भोसले व शिवाजी रोशन भोसले दोघे रा. हत्राळ रोड साकेगाव, ता. पाथर्डी, आकाश शेरू ऊर्फ लोल्या काळे, दौलत सुकनाश्या काळे, सिसम वैभव काळे सर्व (रा. वाळकेवस्ती, माळीवाभुळगाव) यांना पोलिसांनी अटक केली होती. हत्राळ रोडवरील एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला नगरच्या बाल न्यायालयातून घरी सोडून देण्यात आले होते. तर आज्या ऊर्फ बेडरूल सुरेश भोसले रा. टाकळीफाटा, बेऱ्या ऊर्फ किशोर रायभान भोसले (रा. हत्राळ रोड, साकेगाव, लोल्या ऊर्फ फैय्याज ऊर्फ शेरू सुकनाशा काळे (रा. माळी बाभुळगाव, ता. पाथर्डी, सेशन ऊर्फ रोशन ऊर्फ बल्लु रायभान भोसले (रा. हत्राळ रोड, साकेगाव), हे चौघेजण फरार आहेत. तपासात वरील आरोपींविरुध्द पाथर्डी येथे सहा, शेवगाव, सिलगाव व खुलताबाद येथे प्रत्येकी एक, असे विविध पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल आहेत. वरील आरोपींनी
पाथर्डी व शेवगावमध्ये अनेक चोरीच्या घटना घडत आहेत. वारंवार गुन्हे करणारे काहीजण चोरटे पुढे आले आहेत. संघटितपणे गुन्हे करणाऱ्याऱ्यांना चाप बसला पाहिजे. कायद्याचा धाक त्यांना राहिला पाहिजे. तिसगाव खून व चोरी प्रकरणातील आरोपींना मोक्का लावला आहे. अजूनही काही जणाविरुध्द कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सुनील पाटील, पोलीस उपाधीक्षक शेवगाव-पाथर्डी.
चोरी व खून प्रकरणातील आरोपींना मोक्का लावल्याने इतर चोरट्यांवर वचक बसण्यासाठी मदत होणार आहे. पोलिसांनी कोठेवाडी प्रकरणातील आरोपींनामोक्का लावला होता. त्यानंतर आता पुन्हा तिसगाव खून व चोरी प्रकरणात त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संघटित गुन्हेगारी केल्याचे आढळले असून, याबाबत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाचे वाढीव कलम लावण्याची परवानगी पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत नाशिक परिक्षेत्राचे विषेश पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे २६/ १०/२०२४ रोजी मागितली होती. त्याला नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी २ डिसेंबर २०२४ रोजी परवानगी दिली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (क), ३(२), ३ (४) नुसार वाढील कलम लावुन पाच आरोपींना पुन्हा अटक करण्याची परवानगी मागितली होती. परवानगी नंतर ६ डिसेंबर २०२४ रोजी उमेश रोशन भोसले व शिवाजी रोशन भोसले, आकाश शेरू ऊर्फ लोल्या काळे, दौलत सुकनाश्या
काळे, सिसम वैभव काळे या पाच जणांना अटक करण्यात आली. ७ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर येथील विशेष मोक्का न्यायाधीश बागल यांच्यासमोर पाच आरोपींना हजर केले असता, त्यांना १० दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक सुनील पाटील करीत आहेत. तालुक्यातील या भोसले टोळीला मोक्का लावल्याने इतर गुन्हेगारांवर वचक बसण्याची शक्यता आहे. यातील चार अरोपींना अद्याप अटक करावयाची आहे. त्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी शोध घेत आहेत. गुन्ह्यातील वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या असून, आणखी एक मोटारसायकल जप्त करावयाची आहे. यातील आरोपी अटक झाल्यानंतर आणखी काही गुन्हे समोर येतील का, अशी परिस्थिती आहे.
Tags :
38700
10