महाराष्ट्र
11961
10
मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर' निवडणूक प्रक्रियेला ब्रेक
By Admin
मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर' निवडणूक प्रक्रियेला ब्रेक
तीन सोसायट्यांचा कार्यक्रमही थांबवला
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क
अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यातील सहकारातील निवडणुकांना ३१ मे पर्यंत ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे आता मुळा, ज्ञानेश्वर आणि वृद्धेश्वर कारखान्यांसह खिर्डी, माळवाडगाव, कारेगाव वि.का. सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रियाही 'आहे त्या टप्प्यावर' थांबवली जाणार आहे.बारामतीसोबत नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा
पोटनिवडणूक सुरू असल्याने प्रशासन व पोलिस यंत्रणा व्यस्त राहणार आहे.
परिणामी, सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त,
मतदान केंद्राची उपलब्धतता याबाबतीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज बांधून, अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि. ३१ मे २०२६ पर्यंत
जिल्हा बँकेवर प्रशासक कधी?
जिल्हा बँकेच्या संचालकांची २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपलेली आहे. मात्र, महिना उलटूनही बँकेच्या निवडणुकीच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. निवडणुकीसाठी बँकेने १५ लाख रुपये फी भरण्याची गरज आहे. दुसरीकडे संचालक मंडळ नसल्याने बँकेवर 'प्रशासक' ही नियुक्त केलेला नाही. त्यामुळे बँकेचा कारभार नेमकं कोण चालवतयं, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता ही निवडणूक पुन्हा दोन महिने लांबल्याने, प्रशासक नियुक्त केला जाणार की, असेच पुढे चालू राहणार.. याकडे लक्ष लागले आहे.
स्थगीत करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपर निबंधक तथा सह सचिव संतोष पाटील यांनी काल काढले आहेत.
दरम्यान, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रभावाखालील
मुळा' सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वातील 'ज्ञानेश्वर 'तर राजळे यांच्याशी संबंधित वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु होती परंतु आता थांबवण्यात आली आहे.याशिवाय
श्रीरामपूर तालुक्यातील तीन सोसायट्यांचाही कार्यक्रम लागला होता. प्रारुप मतदार याद्या, त्यावरील हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया सुरू होती.लवकरच काही संस्थांच्या अंतिम याद्याही प्रसिद्ध करण्याच्या हालचाली होत्या. मात्र तत्पूर्वीच सहकारातील निवडणुकांना पुन्हा 'ब्रेक' लागल्याचे दिसले आहे.
Tags :
11961
10




