महाराष्ट्र
शेवगांव मतदारसंघात सुप्त लाट निर्माण अपक्षांचा भाव वधारणार
By Admin
शेवगांव मतदारसंघात सुप्त लाट निर्माण अपक्षांचा भाव वधारणार
चंद्रशेखर घुले फक्त भावी आमदार नव्हे तर भावी मंत्री : कार्यकर्त्यां मध्ये चर्चेला उधाण
नगर सिटीझन live टीम प्रतिनिधी
या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच पावसाळ्याचे दिवस असताना मतदारसंघ गरमागरम वातावरण निर्माण झाले होते. महायुतीची उमेदवारी बऱ्याच अंतर्गत उलथापालथी नंतर आ. मोनिका राजळे यांना तर महाविकास आघाडीची उमेदवारी ऍड.प्रताप ढाकणे यांना
जाहीर झाली.तदनंतर माजी आ.चंद्रशेखर घुले यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर होताच
सर्वसामान्य नागरिकांमध्ये चंद्रशेखर घुले
फक्त भावी आमदार नव्हे
तर भावी मंत्री अश्या कार्यकर्त्यांमध्ये
चर्चेला उधाण आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव
मतदारसंघात सुप्त लाट निर्माण झाली असल्याचे दिसत आहे राज्याच्या राजकारणात अपक्षांचा भाव वधारणार आणि ते सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका निभावणार असल्याची परिस्थिती त्यात अपक्षांची भूमिका निर्णायक पहावयास मिळत आहे. चंद्रशेखर घुले हे अपक्ष निवडून आले तर त्यांच्यावरराज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी येऊ शकते. शेवगाव आणि पाथर्डी
पाथर्डी विधानसभा निवडणूक यावेळी जरा आगळी वेगळी होणार यामध्ये यात तीळमात्र शंका नाही. जरी ज्या त्या पक्षाचे आणि उमेदवाराचे कार्यकर्ते जरी म्हणत असतील आमचाच गुलाल, आमचाच विजय. मात्र सर्वांना गुलाल आणि विजया मिळणार नाही. कुठला तरी एकच उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे. प्रमुख लढत विद्यमान आमदार राजळे, माजी आमदार घुले, ऍड.ढाकणे, अपक्ष काकडे यांच्यात होणार असली तरी वंचितचे किसन चव्हाण, रा.स.प.चे आत्माराम कुंडकर व ईतर अपक्ष उमेदवार कोणाचे किती मते घेतात यावरच निवडणूकीचे गणित ठरणार आहे. चंद्रशेखर घुले ठरणार जायंट किलर !
एकूणच, राज्याच्या
सत्ताकारणात होणाऱ्या भावी आमदारांची भूमिका महत्वाची असेल
तालुक्यातील उच्चशिक्षीत तरुणांसह सुजाण जनतेने हे हेरले असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढती होत असल्या तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळेल अशी शक्यात वाटत नाही. त्यामुळे या दोघांनाही अपक्षांचा टेकू घ्यावा लागणार आहे. चंद्रशेखर घुले पाटील यांनी हे हेरल्यानेच त्यांनी पवार गटाची उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सत्ता समिकरणात
महत्वाची भूमिका
बजावताना त्याचा फायदा मतदारसंघासाठी होणार असल्याची चर्चा आतापासूनच झडू लागली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुप्त लाट निर्माण झाली आहे त्याचा फायदा कोण करून घेणार यातच विजयाचे गुपित दडलेले आहे
माजी आमदार अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांना तरुणांसह दोन्ही तालक्यातून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यात त्यानी आपली चाणक्यनीती वापरत काही दिवसांपूर्वी मराठा संघर्ष यौध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. तदनंतर तातडीने शरदचंद्र पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत मतदार संघासह अहिल्यानगर जिल्ह्यात खमंग चर्चा झाल्या आहेत.
Tags :
147290
10