महाराष्ट्र
संडे स्पेशल दणका मोडला शेवगांव शहरात मध्यवर्ती भागात कुंटणखाने
By Admin
संडे स्पेशल दणका मोडला शेवगांव शहरात मध्यवर्ती भागात कुंटणखाने चालवणाऱ्यांचा मणका
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगांव शहरातील मध्यवर्ती भागात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या अवैध कुंटणखान्यांची मालमत्ता जप्त करा मुंबई उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश !!!
दिनांक 08 डिसेंबर 2024 वार रविवार या बाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ज्या मालमत्तांमध्ये अवैध कुंटणखाने सुरू आहेत अशा मालमत्ता पिटा पिटा कायदा कलम १८ नुसार सिल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी. नागरिकांच्या तक्रारी आहेत अशा ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. सीसीटीव्हीचे संरक्षण कवच देण्याच यावे असे आदेश न्या. विभा कंकणवाडी व न्या. संतोष चपळगावकर यांनी दिले.
कोविडनंतरच्या काळात अमळनेर येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक दाखल झाले. शेवगाव येथील रेडलाईट एरियामध्ये अशाच प्रकारे नागरिक आल्याने येथे अवैध कुंटणखाने सुरू झाले.
प्रशासनाला ताकीद
नागरिकांना त्रास होईल असे कुठलेच कृत्य स्वीकारले जाणार नसल्याची सक्त ताकीद प्रशासनाला दिली. पिटा खायद्याच्या कलम १८ नुसार ज्या मालमत्तांमध्ये अवैधरित्या कुंटणखाने सुरू आहेत अशा मालमत्ता शोधून नगरपालिका प्रशासनाने त्या सील कराव्यात. पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्हीचे कवच द्यावे.
पोलिसांची गस्त वाढणार
नगरपालिका हद्दीत असलेल्या मालमत्तांमध्ये सुरू सर्वसामान्य असलेल्या कुंटणखान्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला. येथे मद्यप्राशन करून नागरिक येतात आणि कुणाच्याही घरावर थाप मारण्याचे प्रकार वाढले. कधीकधी दारूडे कुंटणखाना सुरू असलेली घरे सोडून इतरांच्या घरात घुसण्याचे प्रकार सुरू झाले. अशा प्रकारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी या विरोधात खंडपीठात धाव घेतली. नागरिकांना होणारा त्रास थांबविला गेला पाहिजे. अवैध
कुटणखाने बंद करण्यात यावे. पोलिसांची गस्त परिसरात वाढविली जावी अशी विनंती करण्यात आली होती. यापूर्वी खंडपीठात शेवगांव नगरपालिका हद्दीतील कुंटणखान्या विषयी याचिका दाखल होती. पोलिसांनी धाड मारत अनेक महिलांना ताब्यात घेत मुंबईच्या संस्थेकडे सोपविले होते.
याविरोधात पुण्याच्या फ्लाईंग फर्स्ट संस्थेचे सत्यजित देसाई आणि त्यांचे शेवगांव मधील सहकारी हे फिर्यादी झाले होते त्यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाल्याने या व्यवसायामुळे त्रासलेल्या परिसरातील नागरिकांनी आनंद वव्यक्त केला आहे आता अहमदनगर चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे अंनवेशन विभाग एलसीबी अहमदनगर आणि शेवगांव चे कर्तव्यदक्ष पि. आय. समाधान नागरे आणि त्यांचे सरकारी नगरपालिका शेवगांव आणि तहसीलदार शेवगांव काय भूमिका घेतात याकडे सर्वसामान्य शेवगावकरांचे लक्ष लागले आहे
Tags :
24203
10