कवडदरा विद्यालयाचे दोन माॅडेलची जिल्हा स्तरावरून राज्यस्तरासाठी निवड
विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
इगतपुरी तालुका- १३ वे १४ वे नाशिक जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन ब्रम्हा व्हॅली अंजनेरी त्रंबकेश्वर
येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रदर्शनात इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाचे दोन माॅडेलची जिल्हा स्तरावरून राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली.सदर दोन्ही माॅडेल राज्यस्तरावर गेले आहे.पहिले माॅडेल सिलींग फॅन क्लिनर हे उपकरण कु. स्वप्नल श्रीराम लोहार हिने बनवले होते.दुसरे माॅडेल उपकरण
वाटर टॅंक क्लिनर कु. रोशनी ज्ञानेश्वर घोडे हिने बनवले होते.यांना विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक श्री श्रीराम शंकर लोहार
श्री प्रमोद एकनाथ परदेशी यांचे विशेष सहकार्य मिळाले. सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे भारत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष व सचिव, सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व कवडदरा परिसरातील सर्व ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देवून अभिनंदन केले.