जिल्हा बँक शेतकऱ्यांची कामधेनू : कर्डिले
By Admin
जिल्हा बँक शेतकऱ्यांची कामधेनू : कर्डिले
आर्थिक स्थिती उत्तम असल्याची ग्वाही : ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी
प्रगतीत आणि नफ्यात सहकारी साखर कारखान्यांचा मोठा वाटा आहे, असा निर्वाळा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिला.
दरम्यान, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असल्याचा निर्वाळा देखील चेअरमन कर्डिले यांनी या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षीय मनोगतात दिला.
स्थापना काळापासून शेतकरी ग्रामीण परिसर आणि एकूण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पथदर्शी योगदान दिलेल्या आणि एडीसीसी बँक, या अल्पाक्षराने सहकार क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २७) बँकेच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाली. या वेळी सर्वसाधारण सभेला संबोधित करताना चेअरमन कर्डिले बोलत होते. मंचावर बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक अण्णासाहेब
म्हस्के, माजी आमदार भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, बपाजी उर्फ अंबादास पिसाळ, करण ससाणे, अमोल राळेभात, गितांजली काळे, प्रशांत गायकवाड, गणपतराव सांगळे, अनुराधा नागवडे, सुरेश सांळुके, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे आदींसह बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर सभागृहात जिल्हाभरातून आलेले जिल्हा बँकेच्या परिवारातील शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी बँकेच्या चौकशीसंदर्भात तसेच प्रस्तावित नोकर भरती प्रक्रियेबाबत अलीकडच्या काळात प्रश्न उपस्थित केले होते. ढाकणे यांच्या या प्रश्नाबाबत सर्वसाधारण सभेत काय प्रतिक्रिया येणार, याची उत्सुकता सभेच्या सुरुवातीपासूनच अनेकांना होती. यासंदर्भात
संबंधीत साखर कारखान्यांना मदतच केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सभेच्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षे यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन केले असल्याचा दावा केला तसेच साखर कारखान्यांना देण्यात आलेले कर्ज बेकायदेशीर नाही, हे कारखाने आपलेच असल्याचे सांगत बँकेच्या विविध खर्चासह संगणक प्रणाली अद्ययावत करण्यासाठी खर्च करण्यात येत असल्याचे सांगितले. सहकार खात्याच्या चौकशीदरम्यान आवश्यक कागदपत्रे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या चौकशी विरोधात सहकार मंत्र्यांकडे अपील करण्यात आल्याचा खुलासा सुरूवातीला केला. त्यानंतर बँकेच्या कामकाजाबाबत माधवराव दातीर, कोंडीजी उगले, रणजीत बनकर, मच्छिद्र
जिल्हा बँक शेतकऱ्यांची कामधेनू : कर्डिले
आर्थिक स्थिती उत्तम असल्याची ग्वाही : ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बोलताना चेअरमन कर्डिले म्हणाले, कर्ज नाकारले म्हणून ते बँकेवर आरोप करीत आहेत. आता कायदेशीर सल्ला घेऊन त्यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचा इशारा टीकेला उत्तर देताना दिला. तर संभ्रम आणि नवीन प्रश्न निर्माण होतात, यामुळे आम्ही गप्प राहणे पसंत केले. मात्र, आमच्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यामुळे आता स्पष्टपणे बोलत आहे. ज्यांना कुणाला बँकेच्या कामकाजाबाबत शंका असतील, त्यांनी बँकेत येऊन त्या विचाराव्या. सर्व प्रश्नांची, शंकांची उत्तरे दिली जातील. जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू, बँक आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणूनच सर्व घटकांनी बँकेकडे पहावे, अशी विनंती त्यांनी केली. अडचणीच्या काळात बँकेने
आमदार थोरात यांचा गौरव
राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना राज्य विधिमंडळाने नुकतेच विधिमंडळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले, याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत मांडण्यात आला. सर्वसाधारण सभेने टाळ्यांच्या गजरात एकमताने हा ठराव संमत केला.
विपर्यासाची वक्तव्य नकोच
बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले
आपल्या मनोगतात म्हणाले, या आर्थिक संस्थेबद्दल लोकांमध्ये गैरसमज होईल असे वक्तव्य करु नयेत. राजकारणाबाबत माझ्यावर व्यक्तिगत टीका दररोज केली तरी चालेल, पण आर्थिक संस्थेवर टीका करताना प्रत्येकाने प्रथम शहनिशा कारावी. संस्थेबद्दल विपर्यास करणारी वक्तव्य कोणीही करु नयेत.
काळे, मारूती लांडे, निवृत्ती पवार यांनी मनोगत व्यक्त करीत कामकाजाबाबत सूचना
केल्या.