राजळे महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प विषयावर व्याख्यान संपन्न
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील
श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे श्री. दादापाटील राजळे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज अंतर्गत येणाऱ्या सामाजिक शास्त्र मंडळ आणि लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी, आदिनाथनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "केंद्रीय अर्थसंकल्प" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते डॉ. सुभाष देशमुख यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे विविध पैलू, त्याचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा प्रभाव यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनोद भोईटे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाचा अभ्यास करून अर्थव्यवस्थेच्या घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन डॉ. दशरथ दळवी यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले, तर श्री. फलके व्ही. बी. यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.
या व्याख्यानास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.