महाराष्ट्र
पाथर्डी व शेवगाव परिसरात घरफोडी करणारे सराईत जेरबंद
By Admin
पाथर्डी व शेवगाव परिसरात घरफोडी करणारे सराईत जेरबंद
३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कासार पिंपळगाव येथेही केली होती चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी व शेवगाव या
परिसरात घरफोडी करून मोठा मुद्देमाल लंपास करणाऱ्या सराईतांच्या टोळीतील दोघेजण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. यांच्याकडून ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सचिन ईश्वर भोसले (वय २१, रा.बेलगाव, ता. कर्जत) व सचिन बंबळया काळे (वय २१, रा. नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव यथील बाळासाहेब यशवंत भगत हे दि. २८ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेल्यानंतर त्यांचे राहते घरी अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील १ लाख ३ हजार ६०० रूपये
किंमतीचा मुद्देमाल चोरुन देल्याची घटना घडली होती. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि. अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, जालींदर माने, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांच्या पथकास दिला होता.
या तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन, पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीतील चोरीस गेला माल व आरोपीची माहिती घेत असताना दि.१६ ऑक्टोबर रोजी पोसइ. सालगुडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सचिन ईश्वर भोसले याने त्याचे साथीदारासह केला असुन ते पाथर्डीवरून अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती दिली. मिळालेल्या या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अहिल्यानगर बेलेश्वर चौकात सापळा लावला या दरम्यान दोन संशयीत मोटारसायकलवर आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सचिन ईश्वर भोसले, सचिन बंबळ्या काळे असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता सचिन ईश्वर
भोसले याच्याकडून २० लाख १० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने व सचिन बंबळ्या काळे याच्याकडून ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने व एक मोटारसायकल असा एकुण ३ लाख ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार गहिन्या ईश्वर भोसले, रा. बेलगाव, ता. कर्जत (पसार) व भगवान ईश्वर भोसले, रा. बेलगाव, ता. कर्जत (पसार) यांच्यासह कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी व सामनगाव ता. शेवगाव येथे घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत
Tags :
59410
10