पाथर्डी तालुक्यात दहा दिवस जनता कर्फ्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - मंगळवार 04 मे 2021
पाथर्डी तालुक्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी व लोक प्रतिनिधी यांची आज पाथर्डी तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
६ ते १६ मे याकाळात बंद
जनता कर्फ्यू हा ६ ते १६ मे दरम्यान असणार असून याकाळात फक्त हॉस्पिटल, मेडिकल चालू राहणार आहे. किराणा, भाजीपाला, मासविक्री व शेती विषय विक्रीचे दुकाने बंद असणार आहेत. वाढता कोरोनाचा धोका पाहता, हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीला प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पालवे,पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळी, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक महेश बोरुडे, रमेश हंडाळ उपस्थित होते.