महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व जितेंद्रसिंह सोनीवत यांच्यात शेवटची लढत
वडार समाज मित्र मंडळाच्या वतीने कुस्त्यांचा हंगामा
पाथर्डी प्रतिनिधी :
महराष्ट्र केसरी सिंकदर शेख व हरीयाणाचा राष्ट्रीय कुस्ती विजेता जितेंद्रसिंह सोनीवत यांच्यात शेवटची कुस्ती होईल. यासाठी पाच लाखएक्कावन्न हजार रुपयाचे बक्षीस आहे. पै.पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीव प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात लढत होईल.त्यासाठी चार लाख अकरा हजार रुपयाचे बक्षीस आहे. कृष्णा पवार व करण फुलमाळी यांच्यातीलकुस्तीसाठी तिन लाख अकरा हजाराचे बक्षीस आहे. महाराष्ट्रातील नामांकीत पहीलवांनाच्या कुस्त्याचा हंगामा येथील बाजार समितीच्या मैदानावर १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार असल्याची माहीती माजी नगरसेवक तुकाराम पवार वकोरडगावचे सरपंच भोरुशेठ म्हस्के यांनी दिली आहे.
येथील कृषी उत्पन्नबाजार समितीच्या आवारात वडार समाज मित्र मंडळाच्या वतीने कुस्त्यांच्याहंगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे.माजी आमदार नरेंद्रपाटील घुले व मा.
आमदार चंद्रशेखऱ पाटील घुले यांच्या प्रेरणेतुन पहीलवान तुकाराम पवार वभोरुशेठ म्हस्के यांच्या संकल्पनेतुन दरवर्षी शहरात कुसत्यांचा हंगामा
भरविला जातो. कुस्तीगिरांना त्यांची कला सादर करता यावी. शरीराचे महत्व नव्या पिढीला माहीती व्हावे. पहीलवानांच्या कष्टाची व त्यागाची माहीती लोकापर्यंत पोहचवावी. तसेच नव्या पिढीला आपल्या कुस्तीगिरांबाबत आपलेपणाची भावना वाढीस लागावी, यासाठी वडार समाजाच्या वतीने हा खर्चीक उपक्रम लोकवर्गणीतुन व स्वखर्चातून केला जात आहे. सुमारे विस ते एकवीस लाख रुपयाची बक्षीसे यावेळी कुस्तीगिरांना वाटली जाणार आहेत. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी तिन वाजता बाजार समितीच्या आवारात कुस्त्यांचा हंगामा होत आहे.यावेळी महाराष्ट्रातुन व देशभरातुन पहीलवान येत आहेत. कुस्ती शौकीनांनी कुस्त्यांचा आनंद लुटण्यासाठी उपस्थीत रहावे, असे आवाहन पै.तुकाराम पवार व सरपंच भोरुशेठ म्हस्के यांनी केले आहे.