महाराष्ट्र
33350
10
४० दुचाकींसह दोघे जेरबंद!पाथर्डी तालुक्यातील मुख्य सुञधार आरोपीला अटक
By Admin
४० दुचाकींसह दोघे जेरबंद!पाथर्डी तालुक्यातील मुख्य सुञधार आरोपीला अटक
दुचाकी चोरट्यांच्या टोळीला मोठा धक्का
चोरट्यांची 'मास्टर की' पोलिसांनी केली लॉक
नगर सिटी न्यूज live24 नेटवर्क-
मास्टर की'च्या साहाय्याने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
बावधन परिसरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना नेहमीच्या पद्धतीने न जाता उलट्या दिशेने तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४० चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे २१ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने केली. आश्पाक ईसाक पठाण (वय ३२, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार मुकुंद उद्धवराव हारदास (वय २५, रा. पाटोदा (मावा), ता. परतूर, जि. जालना) यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बावधन परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पारंपरिक तपास पद्धतीऐवजी वेगळी रणनीती अवलंबली. शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी, संशयित हालचालींचा मागोवा आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत सापळा रचला. अखेर पोलिसांच्या अचूक आणि धाडसी कारवाईत आरोपी जाळ्यात अडकले.
तपासादरम्यान आरोपींकडून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून चोरी केलेल्या तब्बल ४० दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दुचाकींची एकूण किंमत अंदाजे २१ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपी मास्टर कीचा वापर करून काही क्षणांत दुचाकी चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरी केलेल्या गाड्या शहराबाहेरील ग्रामीण भागात नेऊन त्या फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या गाड्या आहेत असे सांगत अत्यंत स्वस्त दरात विकल्या जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. बाजारभावापेक्षा खूप कमी किंमत सांगून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. मात्र गुन्हे शाखेच्या चाणाक्ष तपासामुळे हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले असून दुचाकी चोरट्यांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरू आहे.
Tags :
33350
10




