जि.प. शाळेत सोलर संचाचे उदघाटन व लॅपटॉप वितरण
पाथर्डी प्रतिनिधी:
पर्यावरण संवर्धनासाठी अविरत काम करणाऱ्या इसीए पुणे संस्थेच्या चेअरमन विनिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संचालक ले. जनरल सुदर्शन हसबनिस यांच्या शुभहस्ते सोलर संचाचे लोकार्पण तसेच विविध शाळांना लॅपटॉप चे वाटप करण्यात आले.
ईसीए पुणे व बिटवाईज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा धामणगाव, शिरसाटवाडी, रांजणी,पाठकवस्ती व कोलतेवस्ती या शाळातील सोलर संचाचे उदघाटन करण्यात आले.
टिमलीडर गोरक्षनाथ ज्ञानदेव सानप व उमेश क्षिरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून खेड्यापाड्यातील मुलांना संगणक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, शिक्षणात आधुनिकीकरण व्हावे, समाजातील तळागाळातील घटकांना उत्कृष्ठ शिक्षण मिळावे यासाठी लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंदरवाडी, बहिरवाडी, बारादरी, मानेमळा, चितळी, हरिचा तांडा,करडवाडी, शिरापूर,नांदूर, आढळवाडी, सोनाळवाडी, ठोंबरेवस्ती, माळीबाभुळगाव, वायकरवस्ती, पाथर्डी (मुले), वैदुवस्ती या शाळांना मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले.
याप्रसंगी धामणगावचे सरपंच अंकुश गिरी, घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे, धामणगावचे उपसरपंच विठ्ठल कुटे तसेच एस एम सी अध्यक्ष भाऊसाहेब मरकड, ग्रा. प. सदस्य शिवाजी काकडे, कुंडलीक कुटे, शिक्षक नेते राजेंद्र जायभाये, विजयराव अकोलकर, धामणगाव शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग आव्हाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी ले.ज. सुदर्शन हसबनिस यांनी पर्यावरण संवर्धांन तसेच कचरा व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.प्लॅस्टिक वापर बंद, प्रदुषण संदर्भात मार्गदर्शन केले. सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
यावेळी वरील सर्व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. शेवटी सर्वांनी इ सी ए पुणे या सामाजिक संस्थेचे आभार मानले