बाबूजी आव्हाड महाविद्यालयात शरीरसौष्ठव व पॉवरलिफ्टींग स्पर्धा संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी :
बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी आयोजित सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन शरीरसौष्ठव व पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या दोन्ही क्रीडा प्रकारात अहमदनगर जिल्ह्यातील एकूण २२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अहमदनगर क्रीडा विभागाचे सहसचिव प्रा डॉ. विक्रम सातपुते, प्रा. सुभाष देशमुख, प्रा.डॉ. विजय देशमुख, प्रा.डॉ. प्रमोद खैरे, प्रा. डॉ. शरद मगर हे उपस्थित होते. शरीरसौष्ठव स्पर्धेत सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय, संगमनेरचा विद्यार्थी प्रशांत धोत्रे हा अहिल्यानगर विभाग श्री २०२५-२६. या किताबाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत सर्वसाधारण सांघिक विजेते पद सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय, संगमनेर तर उपविजयी संघ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बेलापूर हे झाले. मुलांच्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सर्वसाधारण विजयी संघ बाबुजी आव्हाड महाविद्यालय तर उपविजयी संघ महाराजा जिवाजी शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा हे झाले.
मुलींच्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सर्वसाधारण विजयी संघ बाबुजी आव्हाड महाविद्यालय तर उपविजयी संघ सी. डी. जैन महाविद्यालय, श्रीरामपूर हे झाले. या स्पर्धेमधून सी. डी. जैन महाविद्यालय, श्रीरामपूर येथे होणाऱ्या सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय शरीरसौष्ठव व पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी अहिल्यानगर विभागाचा संघ निवडण्यात आला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून राजेंद्र सोनवणे. प्रा. महेश निंबाळकर,महेश भावसार, प्रवीण चोरमले, प्रशांत गायकवाड यांनी कार्य केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. विजय देशमुख, प्रा. सचिन शिरसाट व महेश फाजगे यांनी परिश्रम घेतले.