'या' साखर कारखान्याचा उचांकी ऊस गाळप करुन गाळप हंगाम सांगता समारंभ सपन्न
By Admin
'या' साखर कारखान्याचा उचांकी ऊस गाळप करून गाळप हंगाम सांगता समारंभ संपन्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - बुधवार 05 मे 2021
आज दि. ५ मे २०२१ रोजी गंगामाई साखर कारखान्याने १२.५५ लाख मे.टन ऊसाचे उचांकी ऊस गाळप करून कृषी उत्पन्न बाजार समीती, शेवगांव चे माजी सभापती संदीप सातपुते यांचे हस्ते उस वाहतुकीचे वाहनांची व गव्हाणीची विधीवत पुजा करून गाळप हंगाम २०२०-२१ चा सांगता समारंभ कोव्हीड-१९ च्या परिस्थीतीमुळे मोजक्याच कर्मचारी व अधिकारी यांचे उपस्थितीत कोव्हीडचे सर्व नियम पाळून संपन्न झाला.
या गाळप हंगामात अतिरीक्त ऊस क्षेत्र, ऊसाचे हेक्टरी उत्पादनात झालेली वाढ व कोरोणाचा वाढता संसर्ग यामुळे साखर कारखान्यापुढे नोंदलेल्या संपुर्ण उसाचे वेळेवर गाळप करण्याचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत ही गंगामाई कारखान्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी यांनी कारखान्याचे चेअरमन मा श्री पद्माकर मुळे साहेब व कार्यकारी संचालक श्री रणजीत मुळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण क्षमतेने ऊस गाळप करून १९२ दिवसात १२.५५ लाख मे.टन उसाचे उचांकी गाळप करून नोंदणी झालेल्या संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप केलेले आहे. ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर गाळप झाल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गाळप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर पासूनच राज्यात व जिल्ह्यात कोव्हीड 19 चे रुग्ण संख्येमद्ये वाढ होत असतानाही कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व उसाचे गाळप होऊन कारखाना व्यवस्थापनाचे उचांकी गाळपाचे उद्दिष्ट् पूर्ण होण्यासाठी सर्व कामगार, कर्मचारी व अधिकारी यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून व काळजी घेऊन गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडला व त्याच प्रमाणे कारखाण्याचे चेअरमन मा श्री पद्माकर मुळे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कार्यकारी संचालक श्री रणजित मुळे साहेब यांनी कारखाण्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना दहा दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देण्याचा केलेला निर्णय जाहीर केला.
तसेच कारखान्याने मौजे घोटण येथे २६ एकर क्षेत्रावर को व्हीएसआय-१८१२१, फुले-९०५७, को-८६०३२ या सुधारीत ऊस जातीचे जादा उत्पादन व साखर उतारा देणारे ऊस बेणे माफक दराने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगीतले . ज्या शेतकऱ्यांना बेणे मळा किंवा सुधारीत जातीचे ऊसाची लागवड करायची असेल त्याचबरोबर प्रेसमड पासून बनवलेले कंपोष्ट खत घ्यायचे आहे त्यांनी शेतकी ऑफीस किंवा गट ऑफीसला संपर्क करून आपली मागणी नोंदवावी असे आवाहन केले.
या प्रसंगी कारखान्याचे तांत्रीक सल्लागार एस.एन. थिटे, व्हाईस प्रेसिडेंट व्हि एस खेडेकर, जनरल मॅनेजर एस. डी. पवार, प्रॉडक्शन मॅनेजर आर. पी. वाळुंज, मुख्य शेतकी अधिकारी आर.एस.कचरे, शेतकी अधिकारी संदीप मनाळ तसेच कारखान्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते .

