महाराष्ट्र
35461
10
पिस्तुलचा धाक दाखवून खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना मारहाण
By Admin
पिस्तुलचा धाक दाखवून खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना मारहाण
२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
चार जण ताब्यात; टोळीचा प्रमुख पसार
पाथर्डी : नाशिक येथून देवदर्शनासाठी आलेल्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बस खांडगाव शिवारात अडवून प्रवाशांना पिस्तुलचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्याकडून साडेआठ तोळे सोने व १६ हजार ५०० रुपये रोख, असा दोन लाख ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज सहा चोरट्यांनी लंपास केला.
घटनेनंतर जमा झालेल्या परिसरातील नागरिकांनी चोरट्यांची कार फोडली. चोरटे पसार झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कबाडी, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी रात्रभर तपास यंत्रणा सतर्क करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. टोळीचा प्रमुख असलेला व तालुक्याच्या पश्चिम भागात दहशत असलेला गुन्हेगार मात्र पसार झाला आहे. पोलिसांची तीन पथके तपास करीत आहेत. नाशिक येथील ब्रीजनगर, जेलरोड परिसरातील खैरनार कुटुंब
देवदर्शनासाठी जेजुरी, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर येथे देवदर्शन करून मढी येथील कानिफनाथांच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन मिनी ट्रॅव्हल्सने बारा जण शनिदेवाच्या दर्शनासाठी शिंगणापूर येथे जाण्यास रात्री निघाले. देवराई येथून जोहारवाडी ते खांडगाव मार्गे पांढरीपुलाकडे जात होते. खांडगाव शिवारात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्सला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आडवी लावली. कारमधून सहा जण उतरले. त्यांच्या हातातत लोखंडी रॉड, काठ्या व
(छाया राजेंद्र सावंत)
पिस्तुल होते. कुरुळे केस असलेल्या अट्टल गुन्हेगाराने चालकाचा दरवाजा उघडून त्याला मारहाण करत मिनी बसमध्ये प्रवेश केला. इतर लोकही आत शिरले. पवण सुखदेव खैरनार यांच्या डोक्याला पिस्तुल लावून टोळीच्या मोरक्याने खैरनार यांची पुतणी आरोही हिचा गळा दाबला. तुमच्या जवळचे पैसे व सोन्याचे दागिने द्या नाहीतर जीवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. इतर एकाने बसच्या काचा फोडल्या. लोखंडी रॉडने मारण्याची लोकांना धमकी दिली. महिलांच्या गळ्यातील
सोन्याचे दागिने व सोन्याच्या अंगठ्या, अशा सुमारे साडेआठ तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी चोरले.
मनोज खैरणार यांचे पंधरा हजार रुपये व चालक निलेश कन्नडवाड याचे पंधराशे रुपये व गाडी चालविण्याचा परवाना व एटीएम कार्ड असा ऐवज चोरट्यांनी चोरला. एवढ्यात कोणीतरी नागरिक आल्याची चाहुल लागताच चोरटे अंधारात पळाले. मात्र, चोरट्यांची स्विप्ट गाडी तेथेच राहिली. बध्यांनी चोरट्यांची गाडी फोडली. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस
● ट्रॅव्हल्स गाडी लुटण्याची घटना समजताच पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहकाऱ्यांसह वीस मिनिटात चोरट्यांची नाकेबंदी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी, पाथर्डी पोलिसांनी प्रवांशांनी सांगितलेल्या वर्णणावरून ही टोळी मोक्यातील आरोपी असलेला व पश्चिम भागात दहशत असलेला कुरळ्या केसाचा गुन्हेगार याची असल्याचे ओळखले. रात्रभर शोधमोहीम राबवली. चार जण ताब्यात घेतले. प्रमुख आरोपी मात्र अद्यापही फरारच आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पाथर्डी पोलिसांच्या कामगिरीबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.
ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक संदीप ढाकणे, महेश रुईकर, संदीप नागरगोजे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कवाडी सहका-यासह घटनास्थळी काही वेळात पोहचले.
पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबविली. एकजण अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. तर दुसरा एक जण पाथर्डी पोलिसांनी पकडून त्यालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे दिले. पाथर्डी पोलिसांनी तीन पथके तयार
केले. आणखी दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. जवखेडे परिसरातील ही टोळी आहे.
गुन्ह्यातील वापरलेलील कार जवखेडे येथील व्यक्तीची आहे. ती कार एक लाख रुपयात तीन वर्षांपूर्वी चोरट्यांच्या टोळी प्रुमखाला विकलेली आहे. मात्र, त्याचे अर्धे पैसे दिले व अर्धे बाकी राहिले म्हणून ती मूळ मालकाच्याच नावावर आहे. मालकाने कार कोणाला विकली हे पोलिसांना सांगितले आहे. पोलीस तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, विलास जाधव, निवृत्ती आगरकर, नितीन दराडे, निलेश गुंड, अक्षय वडते, चालक चव्हाण, भगवान टकले, संदीप बडे, अलताफ शेख, बाबासाहेब बडे यांनीदेखील पथकात उत्तम कामगिरी नोंदविली आहे.
Tags :
35461
10





