महाराष्ट्र
16232
10
रिक्त शिक्षक पदांबाबत खा, लके आक्रमक, झेडपीसमोर उपोषण
By Admin
रिक्त शिक्षक पदांबाबत खा, लके आक्रमक, झेडपीसमोर उपोषण
नगर सिटीझन live24 न्यूज -
अहिल्यानगर जिल्ह्यातील ९६३ रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता भार कमी करावा आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्याच्या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'कार्यवाही सुरू आहे' किंवा 'नियोजन केले आहे', अशी आश्वासने नकोत; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षक कधी मिळणार, याची निश्चित तारीख जाहीर करा, अशी मागणी त्यांनी
केली.
शिक्षकांच्या रिक्त पदांच्या प्रश्नावर खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून (१ सप्टेंबर) जिल्हा परिषदेसमोर निर्णायक लढा सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी विविध राजकीय, सामाजिक व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
खासदार लंके यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत सविस्तर माहिती व ठोस कृती आराखडा मागितला
होता. त्यावर शिक्षण विभागाने ३१ ऑगस्ट रोजी दिलेल्या उत्तरानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील १५० संस्थांनी तब्बल ९६३ रिक्त शिक्षक पदांच्या जाहिराती नोंदविल्या आहेत. तर २७ ऑगस्ट रोजी केवळ १४ संस्थांमधील ३३१ रिक्त पदांसाठी उमेदवारांची शिफारस झाल्याचे प्रशासनाने नमूद केले. या आकडेवारीवरून खासदार लंके यांनी प्रशासनाला थेट सवाल केला. ९६३ पदांची जाहिरात झाली असताना केवळ ३३१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस झाली. मग उर्वरित ६३२ पदांचे काय, ती पदे
सूचनांची अंमलबजावणी झाल्याचा अहवाल द्या
शिक्षकांवरील अतिरिक्त भाराचा तालुकानिहाय आणि शाळानिहाय आढावा घेऊन त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला परिणाम प्रशासनाने स्पष्ट करावा, अशीही त्यांची मागणी आहे. शिक्षकांना बीएलओ, एसआयआर, जनगणना आणि इतर शासकीय कामांसाठी नियुक्त केले जात असल्याबाबतही खासदार लंके यांनी प्रशासनाला जाब विचारला. 'केवळ अध्यापनावर परिणाम होऊ नये, अशा सूचना देऊन प्रश्न सुटत नाही. त्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का, याचा अहवाल प्रशासनाने द्यावा, अशी मागणीही खा. लंके यांनी केली.
आश्वासन नको, शिक्षक कधी मिळणार ते सांगा!
आम्हाला' कार्यवाही सुरू आहे', 'नियोजन केले आहे', 'सूचना दिल्या आहेत' अशी उत्तरे नकोत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष प्रशासनाच्या प्रक्रियेची वाट पाहू शकत नाही. किती शिक्षकांची पदे रिक्त आहेत, किती भरली आहेत, उर्वरित कधी भरली जाणार आणि आजपर्यंतच्या दिरंगाईची जबाबदारी कोणाची, याचे उत्तर दिले पाहिजे. शिक्षकांची रिक्त पदे भरा, शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देणे, अशैक्षणिक कामांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नेमकी कधी भरली जाणार, याची निश्चित तारीख प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षकांची जाहिरात निघणे आणि शिक्षक प्रत्यक्ष वर्गात रुजू होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे शिक्षक प्रत्यक्ष शाळेत रुजू होण्याची अंतिम तारीख जाहीर झाली पाहिजे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये कलाशिक्षक आणि क्रीडा शिक्षकांची पदेही मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे जिल्हाध्यक्ष सितारा काकडे, 'आपला मावळा'चे अध्य रामेश्वर निमसे तसेच अहिल्यानग शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळ अरणगावचे सरपंच पोपटरान पुंड, नगरसेवक योगीराज गाड महादेवराव कोकाटे, चिचोंडी सरपंच शरद पवार, नेप्तीचे शिव पाटील होळकर, संभाजी ब्रिगेडन जिल्हा संपर्कप्रमुख शाम जरू शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक दिलीप वाळुंज तसेच धाराशि येथील शेतकरी संघटनेचे अनिव जगताप आदी उपस्थित होते.
Tags :
16232
10




