महाराष्ट्र
36301
10
भगवानबाबा मल्टिस्टेट'च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By Admin
भगवानबाबा मल्टिस्टेट'च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
न्यायालयाच्या आदेशाने कारवाई चेअरमन, व्हा. चेअरमनसह तेरा संचालक व व्यवस्थापकांचा समावेश
पाथर्डी-नगर सिटी न्यूज live 24 न्यूज
पाथर्डी श्री संत भगवानवावा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पाथर्डी, या पतसंस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमनसह तेरा संचालक व व्यवस्थापकाविरुद्ध अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाथर्डी पोलिसांना दिले. त्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे, अकोला (ता. पाथर्डी) येथील वैद्यकीय व्यावसायिक अरविंद संतोष नागरे (वय ३४), यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर में आदेश देण्यात आले.
संस्थेने अठरा टक्के व्याजाचे आमिष पाखवून फिर्यादी व त्यांच्या आई गंगुबाई नागरे यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मुदत पूर्ण होऊनही ६६ लाख १३ हजार रुपये परत न केल्याने फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींनी २०२५ मध्ये करारनामा करून रक्कम परत देण्याचे वचन दिले. त्यासाठी सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे एकूण तेरा धनादेश
दिले. मात्र, सर्व धनादेश वटले नाहीत, याआधी वारंवार मागणी करूनही केवळ रु. २९,१५० इतकीच नाममात्र रक्कम परत करण्यात आली. संस्थेच्या २०२२-२३ च्या ऑडिट रिपोर्टनुसार संचालक योगेश
गायकवाड यांच्या पत्न च्या कंपनीला रु. ३० कोटी कर्ज, एक पैसाही परत नाही, तरीही कागदोपत्री जोजा कमी केल्याचा दाखला दिला. संचालक मयूर वैद्य यांच्या कंपनीला रु. १० कोटी कर्ज,
धकवाको रु. ११ कोटी ९९ लाखांवर गेली, संचालक नितीन तुपे यांच्या नातेवाईकांनाही तारण न घेता मोठी कर्जे, जवळपास सर्व थकित आहेत. ५ हजारपेक्षा जास्त खर्याच्या काऊचरवर व्यवस्थापक व कॅशिअरच्या सहा नाहीत, रेव्हेन्यू स्टॅम्पाही
नाही. ठेवीदारांची रक्कम वळवण्यासाठी आरोपींनी बनावट कंपन्यांचे जाळे उभारल्याचा आरोप आहे. फाईव्हद्रीक रिअॅलिटी प्रा. लि. (नवी मुंबई) व भगवानबाबा मल्टी पर्पज निधी लिमिटेड,
बा कंपन्यांत आरोपी संचालकच असल्याचे उघड झाले आहे. सप्टेंबर २०२५ रोजी ४१ ठेपीयरांना अहिल्यानगरमधील ३६ फ्लैट्स येण्याचा करारनामा आला. मात्र, आजवर अंमलबजावणी नाही. फिर्यादीने प्रथम पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयातही अर्ज दाखल केला, पण कारवाई झाली नाही. अखेर न्यायालयाने
गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पाथहीं पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य , व्हा. चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य, संचालक शांतलिंग नागनाथ साखरे, जयशाली मयूर वैद्य, राम लक्ष्मण पोपळघट, दिनेश शिवनाथ वैद्य (तत्कालीन संचालक) (सर्व रा. बालमटाकळी, ता. शेवगाव), किशोर अनिल सुरवसे, नितीन सोपानराव तुपे (रा. पिंपळगाव कासार, ता. पाथर्डी), योगेश तुकाराम गायकवाड, वैशाली योगेश गायकवाड (तत्कालीन संचालक) (रा. राकर कॉलनी, नाशिक), अनिल कचरू तिजोरे, पार्वती महादेव राऊत व व्यवस्थापक अविनाश सुधाकर आंधळे (रा. जिरेवाडी, ता. पाथर्डी), या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना नुकसानभरपर्व मित्वबी, अशी मागणी फियांदीने केली आहे. सखोल तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखा व फॉरेन्सिक ऑडिटची मागणीही करण्यात आली आहे.
Tags :
36301
10




