या' पक्षाने अंधश्रद्धेला खतपाणी घातले यांनी केली टिका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 मे 2021, रविवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पारनेर तालुक्यातील भाळवणी येथिल आमदार निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली.
लंके यांच्या अत्याधुनिक अशा जम्बो कोविड सेंटरचे यावेळी त्यांनी कौतुक केले. लंके यांच्या कोविड सेंटर जवळच टाकळी ढोकेश्वर येथे स्थानिक एका भाजप नेत्याने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ केल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी टीका केली. देशात भाजपचे नेतृत्व कोविडचा मुकाबला करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत गोमूत्र प्या, यज्ञ करा अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी करत आहे. रुग्णांची सेवा करा, जनता सेवा यातच देव असतो, असे सांगत त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचा दाखला या वेळी दिला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या निळवंडे धरणाच्या पाहणी दौऱ्यावर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोविड पार्श्वभूमीवर आक्षेप घेतल्याबद्दल त्यांना विचारले असता, पाटील यांनी या भागातील लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे यांनाच फक्त कल्पना दिली होती. त्यांच्या उपस्थितीत निळवंडेच्या कामाची पाहणी केली, असे उत्तर देत लोखंडे यांच्या आक्षेपाला उत्तर देण्याचे टाळले.