पाथर्डी- खेर्डै गावात तरुणाची आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खेर्डे येथील एका तरुणांची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावात घडली आहे. खेर्डे गावातील राजेंद्र रामकीसन जेधे (वय ३०) या तरुणाची जुन्या वादातून तिक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. बबन शेळके (वय ४७), प्रवीण बबन शेळके (वय २३) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.