कानिफनाथांचा जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : चैतन्य कानिफनाथांनी श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अवतार घेतला, त्यांची संजिवन समाधी असलेल्या मढी येथे कानिफनाथांचा प्रकट दिन ( जन्म उत्सव )पारंपारीक पध्दतीने साजरा करण्यात आला. नाथांचा जयजयकार, टाळ, मृदंगांचा ध्वनी, शंखनाद, ढोल ताशाचा निनाद अशा उत्साही वातावरण जन्मउत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.