कांदा लिलाव तीन वाजेपर्यंत होते बंद, बाजार समितीत गोंधळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर
व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटना यांच्यातील वाराई वादामुळे दहा वाजता सुरू होणारे कांदा लिलाव तीन वाजेपर्यत रखडले होते. जिल्हा परिषद संदेश कार्ले यानी गेटवर येऊन आंदोलन केल्यामुळे कांदा लिलाव सुरळीत चालू झाले.
नेप्ती उपबाजार समिती येथे आज, गुरुवारी कांद्याचे लिलाव होते. लिलावासाठी शेतकरी सकाळपासून बाजार समितीमध्ये येऊन बसले. दहा वाजता सरू होणारे लिलाव चालूच झाले नाही. व्यापारी व ट्रान्सपोर्ट संघटना यांच्यात चालू असलेल्या वादामुळे कांदा लिलाव बंद होते. याबाबत तोडगा काढण्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती, संचालक मंडळ यांच्यात बैठक चालू होती . संतप्त शेतकयानी कांदा लिलाव चालू करावे, यासाठी बाजार समितीच्या गेटवर बाह्यवळण रस्त्यावर आंदोलन चालू केले होते. आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. बाजार समितीचे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाजार समितीचे संचालक यांच्यात काहीसा वादही झाला.