पाथर्डी- रद्द झालेली भरती सुरू करा.तरुणांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
पाथर्डी - प्रतिनिधी
सैन्यदलाची रद्द झालेली भरती तातडीने पुन्हा सुरु करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी तरुणांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन दिले. सैन्यदलाची भरती रद्द केल्याचा निषेध करीत घोषणाबाजी करुन ही भरती तातडीने पुन्हा आयोजित करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आर्मी भरती झालीच पाहिजे, युवकांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत युवकांनी भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. मोर्चा दरम्यान तुकाराम मरकड, किशोर मरकड, पांडुरंग शिरसाट, लहु जायभाये, ऋषीकेष खोर्दे, सागर खोले, योगेश कापसे, रोहम सातपुते, सुदाम शिरसाट, विजय लवांडे, ज्ञानेश्वर चव्हाण, आदित्य धस, संदीप फरतारे यांच्यासह सैन्यदलाच्या भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांनी सहभागी घेतला.