महाराष्ट्र
387
10
राज्यमंञी नामदार प्राजक्त तनपुरे यांनी केला पुरग्रस्त भागाचा दौरा
By Admin
राज्यमंञी नामदार प्राजक्त तनपुरे यांनी केला पुरग्रस्त भागाचा दौरा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पुराचा फटका पाथर्डी शेवगाव तालुक्यातील कोरडगाव, आखेगाव वासीयांना बसला. आज ग्रामस्थांची भेट घेऊन गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अधिकारी योग्य ती कार्यवाही करत आहे.
पुरामुळे गावात रोगराई पसरू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले आणि शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितिज घुले तसेच राष्ट्रवादीचे पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टी आणि पुराचा फटका शेवगाव तालुक्यातील आखेगाव वासीयांना देखील बसला. आज ग्रामस्थांची भेट घेऊन गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अधिकारी योग्य ती कार्यवाही करत आहे.
पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावांना केंद्र सरकारच्या निकषा पेक्षा जास्त मदत मिळवून देणार,आपत्ती ग्रस्त गावे त्यात सोमठाणे, कोळसांगावी, मुखेकरवाडी या ठिकाणच्या भेटी नंतर कोरडगाव येथे नुकसान झालेल्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांनची भेट घेतल्यानंतर नामदार प्राजक्त तनपुरे यांनी आश्वासन दिले. कोणावरही अन्याय होणार नाही निकषात बसले नाही तरी सर्वांचे घरांचे,पिकांचे, जनावरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदार यांना दिले,आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत मुख्यमंत्र्यांना भेटून तुम्हाला सर्वतोपरी मदत करू,आपत्ती ग्रस्त गावामध्ये कोविड व्हॅक्सीनेशन प्राधान्याने करणे, विजमंडळाचे खांब डी पी यांची कामे,उखडले रस्ते व बंधारे यांच्या दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले,शेवगाव पं स सभापती क्षितिज घुले,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे,काकासाहेब नरवडे,संजय कोळगे,प्रांताधिकारी केकान साहेब,तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी, विजमंडळाचे सहाय्यक अभियंता,सर्व विभागाचे अधिकारी, मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags :

