शिक्षण विभागात गैरकारभार,दळवी यांचा आरोप
नगर सिटीझन live रिपोर्ट टिम प्रतिनिधी
माध्यमिक वेतन पथक व शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत असून प्रत्येक कामासाठी इथे येणाऱ्या शाळेतील कर्मचाऱ्यांना या गैरकारभाराची शिकार व्हावे लागत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नगर जिल्हा अध्यक्ष शरद दळवी तसेच मुख्याध्यापक संघटनेचे सुनील पंडित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
शाळेतील कर्मचाऱ्यांना विशेषतः लेखणीकाला विविध प्रकारची पगारबिले, नियमित तसेच वैद्यकीय वेतन देयक, जुन्या फरकाचे देयक, पी. एफ. कर्ज प्रस्ताव, वरिष्ठ निवडश्रेणी फरक बिले, कर्मचारी मान्यता प्रस्ताव, कर्मचारी सेवा दाखले, विदयार्थ्यांच्या जातीत /नावात बदल आदी कामासाठी माध्यमिक विभागात कायम जावे लागते. याठिकाणी प्रत्येक कामाचे स्वरूप पाहून राजरोसपणे पैसे घेतले जात आहेत. वेतन पथकही प्रत्येक कामासाठी पैसे घेत असून वेतन पथक कार्यालय हे फक्त गप्पा मारण्याचे व सौदेबाजी करण्याचे ठिकाण झाले आहे, असा आरोपही करण्यात आला.