कोरडगाव चौकातील काम लवकर पूर्ण करा-शिवशंकर राजळे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुहास चौहान याना भेटून तीन हात चौक ते कोरडगाव चौक येथील रस्ता राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराने कामासाठी उकरलेला आहे.परंतु काम अगदी संथ गतीने चालू असल्याने त्याठिकाणी वारंवार ट्रॅफिक जाम होऊन अपघात होत आहे.काल तर ऍम्ब्युलन्स व अग्निशमन ची गाडी देखील ट्राफिक मध्ये अडकली होती.ठेकेदार व महामार्ग यंत्रणेला अनेकदा सांगून देखील काम पूर्ण होत नाही.त्यामुळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक चौहान यांना सरकारच्या निमित्ताने तक्रार केली,तसेच शहर व तालुक्यात होणाऱ्या चोरीच्या घटना वाढते गुन्हे याना तातडीने पायबंद घालावा असे आवाहन शिष्टमंडळाने केले, विषेश म्हणजे पी आय चौहान यांनी देखील महामार्ग अभियंता यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून सूचना केली ,तसेच काम तातडीने पूर्ण न केल्यास होणाऱ्या अपघातांना तुम्हाला जबाबदार धरून कारवाई केली जाईल अशी तंबी दिली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, हुमायून अतार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गर्जे, शुभम वाघमारे, उपस्थित होते