शेवगाव शहरातील मंगल कार्यालयावर धडक कारवाई,कोरोनाचे नियम न पाळल्याने कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आज शेवगाव शहरातील एका मंगल कार्यालवरील कारवाईद्वारे देण्यात आला असून सदर कार्यालयात नियमापेक्षा अधिक गर्दी आढळल्याने ते कार्यालय ‘सील’ करण्यात आले आहे. त्यासोबतच मंगल कार्यालयाच्या मालकासह नवदाम्पत्य आणि त्यांच्या आई-वडीलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरमध्ये घोषणा झालेल्या आदेशाची पहिली कारवाई शेवगाव तालुक्यात झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संगमनेरसह जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये धक्कादायकरितीने संक्रमणात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज संगमनेर येथे भेट दिल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणार्या मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई ऐवजी महामारीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत ‘सील’ करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचा पहिला धक्का आज शेवगाव शहरातील एका मंगल कार्यालवरील कारवाईद्वारे देण्यात आला आहे.