श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी नारायण काकडे यांची निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन नारायण काकडे यांची श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल पंचक्रोशीतील लोकांनी काकडे यांचे अभिनंदन आणि सत्कार केले. नारायण काकडे यांच्या कार्याची दाखल घेऊन आमदार मोनिका राजळे व जिल्हा परिषद सदस्य, राहुल राजळे यांनी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक म्हणून निवड केली.