पोलिस कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी समाधान अच्युतराव भुतेकर (वय ३३, रा.वारुळाचा मारुती रोड, दातरंगे मळा) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
भुतेकर यांचे मुळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात आहे. ते नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. प्रारंभी मुख्यायालयात काम केल्यानंतर पाच वर्षापुर्वी त्यांची शहर वाहतूक शाखेत नियुक्ती झाली होती. शहर वाहतूक शाखेतील पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर त्यांची नुकतीच कोतवाली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. लवकरच ते कोतवाली पोलिस ठाण्यात रुजू होणार होते. मात्र अज्ञात कारणातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन विवाहित बहिणी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. भुतेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत.