विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान महत्वाचे – प्राचार्य डॉ. राजधर टेमकर
पाथर्डी- प्रतिनिधी
दादापाटील राजळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व स्वच्छता ही सेवा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर हे उपस्थित होते. त्यानी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजने महत्व सांगताना विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, नेतृत्वगुण, कलाविकास होण्यात राष्ट्रीय सेवा योजना महत्वाचे योगदान देते असे सांगितले. त्याच बरोबर महाविद्यालयाच्या स्थापने पासून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विकासाचा आढावा स्वयंसेवकापुढे मांडला. महात्मा गांधीच्या जयंती निमित्त राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा हे अभियान यशस्वी करण्याचे आव्हान त्यांनी स्वयंसेवकांना केले. या प्रसंगी कला शाखाप्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. राजू घोलप, ग्रंथपाल डॉ. राजकुमार घुले, डॉ. संजय भराटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आसाराम देसाई यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. महेश गोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी ए. एच. देसाई, प्रा. दुर्गा भराट, प्रा. अस्लम शेख, प्रा. अजुंम सय्यद, प्रा. बी. पी. चव्हाण, यांनी परिश्रम घेतले.