संकट समयी आम्ही आपल्यासोबत- घुले
By Admin
संकट समयी आम्ही आपल्या सोबत.- घुले.
जि. प. अध्यक्षांचा शेवगांव तालुक्यातील पुर्व भागात कोविड दौरा
बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात कोवीड सेंटर सुरु करण्याची मागणी
कोरोनाच्या संकटसमयी आम्ही आपल्या सोबत खंबीरपणे उभे आहोत, परंतु परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वानी शासनाचे नियम पाळणे महत्वाचे असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले व डॉ क्षितिज भैय्या घुले यांनी
बोधेगाव येथिल ग्रामीण रुग्णालयात लोकांशी संवाद साधताना मांडले.
शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथिल ग्रामीण रुग्णालयात कोविड लसिकरण, टेस्टिंग व पेशंट यां संदर्भातील नागरिकांच्या समस्या घुले यांनी जाणून घेतल्या. दरम्यान शेवगांव तालुक्यातील पुर्व भागातील प्रा आरोग्य केंद्र -घोटन, चापडगाव, हातगाव तर ग्रामीण रुग्णालय
बोधेगाव या ठिकाणी ना राजश्रीताई घुले, शेवगांव पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले यानी वाढत चाललेल्या कोविड च्या पार्श्वभूमीवर भेटी देउन समस्या जाणुन घेतल्या दरम्यान बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालय पुर्ण क्षमतेने चालावे, आर टी पिसी आर ची चाचणी सुरु करण्याबरोबर
कोरोनाचा वाढता चाललेला प्रकोप पहाता बोधेगाव याठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी सचिन घोरतळे सह कार्यकर्त्यानी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, गटविकास अधिकारी महेश डोके, कासार साहेब, बोधेगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ नागरगोजे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक मोहनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती रामनाथ राजपुरे, मा जि प सदस्य तथा उपसरपंच नितीन काकडे, पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, बाबा देशमुख सर, क्षितिज भैय्या घुले युवा मंचचे अध्यक्ष संतोष पावसे, रोहन साबळे, मोहित पारनेरे , संतोष जाधव, राहुल भोंगळे, मयुर हुंडेकरी उपस्थित होते. .