आंबी-दवणगांव येथे मुसळधार पावसाने पिकाचे मोठे नुकसान
अहिल्यानगर- राहुरी तालुक्यात सात आठ दिवसापासून सतत सुरु असलेल्या अति मुसळधार पावसामुळे शेतातील खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
देवळाली,केसापुर,आंबी, अंमळनेर, दवणगाव, संक्रापूर,पिंपळगाव,गंगापूर चिंचोली,कोल्हार खुर्द,करजगाव या गावात दमदार मुसळधार पावसाने कपाशी,सोयाबीन, मका,कांदा रोपाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेताला ओढ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऊस,कपाशी,मका आदि पिके अक्षरशः जमिनदोस्त झाले आहेत .पाणी साचून काही झाडे वाऱ्याने उन्मळून पडली आहेत. शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बळीराजा आता हवालदिल होऊनआर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिक हिराऊन जाऊन राजाने मारले आणि पावसाने झोडपले अशी स्थिती झाली आहे. तरी लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष घालून नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत लवकरात लवकर मिळून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निरंजन होन यांचेसह नुकसानग्रस्त शेतकरी यांनी केली आहे.