कवडदरा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
सिन्नर- प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काँलेज कवडदरा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती व महान थोर शास्त्रज्ञ डाॕ.ऐपीजे अब्दुल कलाम व डाॕ.सि.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.व्हि.एम.कांबळे यांनी केले .यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील कु.ईश्वरी डामसे, मयुरी डामसे,जगन तारडे,कल्पेश भगत,श्रवणी देशमुख,स्नेहल कोकणे,समृद्धी डामसे यांनी विज्ञान दिनाबद्दल विज्ञान संदर्भात शास्त्रज्ञांनी विविध वैज्ञानिक लावलेले शोध या संदर्भात माहीती सांगितली.यावेळी प्राचार्य श्री. व्ही.एम.कांबळे,श्री. एफ.वाय.शेख,श्री. अमोल म्हस्के, श्रीमती सुलोचना भोईर,श्री जी.जे.जाधव यांनी
शिक्षकांनी २१ शतकातील विज्ञानाचे महत्त्व तसेच आपल्या सभोवती विज्ञानामुळे झालेला बदल तसेच शास्त्रज्ञांनी केलेले विविध प्रयोग करुन लावलेले शोध याविषयी माहीती दिली.यावेळी विज्ञान शिक्षकांचा पुष्पगुच्छ देवून मुख्याध्यापक कांबळे सर व इतर शिक्षक यांनी सन्मान केला.तसेच विद्यालयातील कु.पुष्पा वाकचौरे हिने विज्ञान प्रदर्शन बनवलेले उपकरण राष्ट्रीय पातळीवर गेल्याबद्दल तीचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.यावेळी कार्यक्रमाचे सुञ संचलन कु. तन्वी रोंगटे,कु.समृद्धी डामसे,कशिश रोंगटे यांनी केले.