पाथर्डी तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना ७६ कोटी पिक विमा मंजूर
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना मागील हंगामातील पिक विमा पोटी सुमारे ७६ कोटी रुपये मंजूर असून या महिन्याअखेर ही रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जाईल, असे आश्वासन तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिले असल्याची माहिती शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत पवार यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्याप्रसंगी तहसीलदार उद्धव नाईक, कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी हे आश्वासन दिले.
या आंदोलनात शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत पवार, सेनेचे ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण, मा. सरपंच आसाराम ससे, ज्येष्ठ नेते अंबादास आरोळे, नवनाथराव उगलमुगले, भागवत नरोटे, नवनाथ वाघ, हरिभाऊ वायकर, महादेव राहटे, नंदकुमार डाळिंबकर, दादा माळी,मंगेश राठोड, सचिन नागापुरे, सतिश वारुंगुळे, संजय कराळे, महेश दौंड, पै. रामेश्वर कर्डीले, राजू घोडके, पमा देशमुख सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देऊन उपोषणकर्ते बरोबर चर्चा करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करते, असे सांगितले.