इगतपुरी तालुका स्तरीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुका स्तरीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024-25
अतिशय आनंदात व खेळी मेळीच्या वातावरणात पार पडल्या या स्पर्धेसाठी खास प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्यध्यापिका रजनी मॅडम यांनी उदघाटन केले व खेळाडूंना मोलाचे अशे खेळाबद्दल सल्ले दिले व शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे इतर पदाधिकारी पण उपस्थित होते त्यात शाळेच्या सी ई ओ स्नेहल मॅडम शिक्षिका देवरे मॅडम तसेच एस के सी शाळेचे क्रीडा शिक्षक राज शर्मा सर
लिटल ब्लॉसम चे क्रीडा शिक्षक श्री लगड सर उपस्थित होते.
या स्पर्धेची तयारी केली ती श्री गोडसे सर यांनी अतिशय सुंदर असे मैदान इगतपुरी तालुक्यातील संघाना उपलब्ध करून दिले. त्यात खेळाडू पण आनंदी होते ते मैदान बघून सर्व खेळाडूंनी गोडसे सर यांचे आभार मानले. मुख्य पंच म्हणून रमेश उबाळे यांनी भूमिका पार पाडली.
शेवटी अंतिम निकाल पुढील प्रमाणे
धावसंख्या
पहिला डाव
प्रियदर्शनी 70/3 बाद
8 षटके
जय बरकले 32 धावा नाबाद
आयुष बलधावा 2 बळी
दुसरा डाव
लिटल ब्लॉसम
71/2
5.4 चेंडू
श्लोक पवार
15 चेंडू 44 धावा
3 चौकार व 3 षटकार
अंतिम सामना विजयी संघ
लिटल ब्लॉसम 8 खेळाडूंनी विजयी
जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र खूप खूप शुभेच्छा दिल्या.