breaking news- पश्चिम बंगालमध्ये पुन्हा 'ममता' लाट,भाजपला धक्का
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी -
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत तृणमूल काँग्रेसला २०६ जागांवर आघाडी असून भाजप ८३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस केवळ तीन जागांवर आघाडीवर आहे. २०१६ प्रमाणेच या निवडणुकीतही ममता बॅनर्जी यांची लाट कायम असल्याचे दिसून आले आहे. Trinamool Leading Towards Clear win in West Bengal
२९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथे मोठ्या सभा घेतल्या.
भाजपने निवडणुकीआधी तृणमूलचे अनेक नेते फोडून ममता बॅनर्जींना धक्का देण्याचा प्रयत्न केला.
नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दुसऱ्या मतमोजणी अखेर ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा व्होट शेअर ४४.९ टक्के होता तर भाजपचा १०.२ टक्के होता.
सुरुवातीला भाजप आणि कडवी झुंज असल्याचे दिसून येत होते. पण नंतर तृणमूलने भाजपला मागे टाकले. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत. यावेळी पश्चिम बंगालमधली जनता पुन्हा एकदा त्यांच्याच हाती सत्तेच्या चाव्या सोपवेल असे सुरुवातीच्या कलांवरुन दिसते आहे
सध्याचे कल -
पश्चिम बंगालमध्ये (२९२ जागा)
तृणमूल - २०७
भाजप - ८३
काँग्रेस - १
इतर - २